मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाशी सामना करण्यासाठी आता नागरिकांना हवी ती लस निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये, कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करण्यापूर्वी, हे देखील पाहिले जाऊ शकते की कोणत्या लसीकरण केंद्रात कोणती लस उपलब्ध आहे. यासह वयानुसार लसीकरण केंद्रे शोधण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कारण सर्व वयोगटातील लोकांना सर्व केंद्रांवर लस दिली जात नाही.
लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रियेत काही बदल
- ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरणापूर्वी नोंदणी करण्याचा सल्ला दिला जातो.
- १८ ते ४५ वयोगटातील लोकांना ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे.
- कोविनवर नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या निवडीची सुविधा देण्यात आली आहे.
- यावेळी, पोर्टलवर कोणत्या केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे हे दाखवले जाते.
- यामुळे लोकाना आता आपल्याला पाहिजे ती लस निवडता येईल. अर्थात त्यासाठी ती लस उपलब्ध असलेल्या केंद्रांवर जावे लागेल.
- यापूर्वी सरकारने असे म्हटले होते की लोकांना लस निवडण्याची सुविधा दिली जाऊ शकत नाही.
हा बदल देखील आवश्यक आहे असे सरकारी सूत्रांनी सांगितले कारण ज्या लोकांना दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांना कोणत्या केंद्रात कोणती लस दिली जात आहे हे माहित असावे. खरंतर, कोवॅक्सिन कमी प्रमाणात पुरवठा करीत आहे आणि फार कमी केंद्रांवर उपलब्ध आहे. दुसरे म्हणजे, दीड महिन्यांपूर्वी एखाद्या व्यक्तीने ज्या ठिकाणी कोवॅक्सीन लस घेतली, हे गरजेचं नाही की केंद्रात पुढे तिच लस उपलब्ध असेल. तर कोणतीही व्यक्ती कोणत्याही केंद्रावर लस लागू करू शकते. त्यामुळे कोणत्या केंद्रात कोणती लस दिली जात आहे, याची माहिती कोविनवर दिली जात आहे. लसींवर क्लिक करून केंद्र सर्च करण्याची सोय देखील दिली आहे. यामुळे दुसरा डोस घेणार्यांना देखील मदत होईल.
लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधा
- वयानुसार लसीकरण केंद्र शोधण्याची सुविधादेखील पुरविली गेली आहे.
- ४५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी ज्या केंद्रावर लस दिली गेली आहे, तिथे गरजेचं नाही की ४५ वर्षांच्या लोकांनाच दिली जाणार.
- त्यामुळे वयानुसार सर्च करण्याची सुविधादेखील पुरविली गेली आहे.
- बर्याच राज्यांनी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे तयार केली आहेत.
- अशा परिस्थितीत या वयोगटातील लोकांना कोविनवर लस सर्च करण्यात मदत मिळते.
- तसेच, पिनकोड व जिल्हा आधारित लसीकरण केंद्राची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
लोकांच्या सोयीने लसीकरण
- कोविन अॅपमधील काही बदलांमुळे आता लोकांना त्यांच्या सोयीनं लसीकरण शक्य होणार आहे.
- ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक कोणत्याही केंद्राच्या निवडीशिवाय नोंदणी करू शकतात.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, त्याला चार अंकी एक विशेष सुरक्षा कोड मिळतो, ज्याची नोंद करत किंवा सेव्हद्वारे कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन सांगू शकतो.
- फोन नंबर आणि विशेष कोड सांगून लस मिळू शकते.
- कोणत्याही एका लसीकरण केंद्राचीच सक्ती केली जाणार नाही.
- कोविनवर अलीकडेच चार-अंकी विशेष सुरक्षा कोडची व्यवस्था करण्यात आली आहे.
- लस घेणाऱ्याने कोड नमूद केला आहे आणि तो पोर्टलमध्ये नोंदविला जातो, तेव्हाच लसीकरण केले जाते.
- त्यानंतरच लसीकरण प्रमाणपत्र तयार केले जाते.