मुक्तपीठ टीम
चंद्र म्हणजे भारतासाठी आणि भारतीयांसाठीही एक वेगळं नातं. बालपणी चांदोमामा, मोठेपणी प्रेमाचा साक्षीदार, म्हातारपणी सरत्या वयातील आठवणींना उजाळा. धर्म कोणताही असला तर तेथेही चंद्र आहेच. अशा चंद्रावर स्वारी करण्यासाठी आता भारत सज्ज झाला आहे. या ऑगस्ट महिन्याच भारतीय चांद्रयान – ३ हे चंद्रावर पोहचण्याची शक्यता आहे.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी याबद्दल माहिती देताना चांद्रमोहिमेचा मुहुर्तच उघड केला. ते म्हणाले की, चांद्रयान-३ चे प्रक्षेपण ऑगस्ट २०२२मध्ये नियोजित आहे. चांद्रयान-२ मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील मोहिमेची दिशा ठरवण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांनी केलेल्या सूचनाही विचारात घेण्यात आल्या आहेत. त्यावर आधारित चांद्रयान-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मोहिमेशी संबंधित अनेक हार्डवेअर आणि त्याच्या विशेष चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या ऑगस्ट २०२२ मध्ये चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात येणार आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.
२०२२ (जानेवारी ते डिसेंबर २२) दरम्यान, ०८ लाँच व्हेइकल मिशन्स, ०७ स्पेसक्राफ्ट मिशन्स आणि ०४ टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर मिशन्स यांसारख्या नियोजित मोहिमांची संख्या १९ आहे, अशीही माहिती मंत्र्यांनी दिली.
कोरोना महामारीचा परिणाम सुरु असलेल्या अनेक मोहिमांवर झाला. तसेच, अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि नव्याने सादर केलेल्या मागणीवर आधारित नमुन्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम पुन्हा निश्चित करण्यात आला आहे. मागील ३ वर्षात खालील मोहिमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांची यादी