Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“सोमय्यांना एक दगड मारला तरी महागात पडेल”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा हसन मुश्रीफ यांना इशारा

September 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
BJP-NCP

मुक्तपीठ टीम

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तरे द्या आणि कायद्याची लढाई कायद्यानेच लढा. किरीट सोमय्या यांना तुमच्या कार्यकर्त्यांनी एक दगड मारला तरी महागात पडेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

 

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले पाहिजे आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी. ती चपलेने लढू नये. कारखान्यामध्ये ९८ कोटी रुपये ज्या कंपन्यातून आले त्या कंपन्या कोठे आहेत आणि कोलकत्याच्या कंपन्यांनी थेट कोल्हापूर जिल्ह्यात गुंतवणूक कशी केली यावर बोलावे. मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनी केलेल्या पहिल्या आरोपांवर अजून उत्तर दिलेले नाही, दुसऱ्या आरोपांबाबत मूळ विषयाबद्दल बोलावे. लवकरच तिसरा आरोप होणार आहे.

 

ते म्हणाले की, किरीट सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणार होते तर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली ही हुकूमशाही आहे. याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल.

 

त्यांनी सांगितले की, भाजपाच्या रडारवर केवळ शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आहे हा आरोप चुकीचा आहे. लवकरच काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची प्रकरणे बाहेर काढली जातील. भाजपाच्या रडारवर कोणी पक्ष नव्हे तर भ्रष्टाचार, अन्याय आणि महिलांवरील अत्याचार आहे.

 

भाजपाची ऑफर नाकारली म्हणून आरोप होतात हे हसन मुश्रीफ यांचे म्हणणे प्रदेशाध्यक्षांनी खोडून काढले. मुश्रीफ यांना भाजपाने कधीही ऑफर केली नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

भाजपा राज्यसभेची पोटनिवडणूक लढविणार असून पक्षातर्फे मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय उमेदवार असतील. २२ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल व आपण स्वतः त्यावेळी उपस्थित राहणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.


Tags: chandrakant patilhasan mushrifNCPShivsenaकिरीट सोमय्याचंद्रकांत पाटीलभाजपाशिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसहसन मुश्रीफ
Previous Post

“माध्यमं, उद्योगपती, राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम भाजपकडून सुरु”: नाना पटोले

Next Post

“शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म!” अनंत गीतेंसारख्यांच्या उद्रेकामागील समजून घ्या कारणं…

Next Post
anant gite

“शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म!” अनंत गीतेंसारख्यांच्या उद्रेकामागील समजून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!