मुक्तपीठ टीम
राज्याचे नवे गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताचं पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांचे राजकीय वैचारिक संबंध तपासण्याची भूमिका मांडली होती. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता त्यांना लक्ष्य केले आहे. पाटील यांनी वळेसे-पाटील यांना प्रश्न केलाय की संघाशी असलेल्या संबंधांची चौकशी करण्यासाठी ती दहशतवादी संघटना आहे का?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विधान
दिलीप वळसे-पाटील यांनी गृहखात्याच्या कार्यभार हाती घेतल्यानंतर, काही अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची चर्चा असल्याचे सांगत राजकीय निष्ठा बाळगून असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी पुढील उत्तर दिले होते:
‘कुणाची निष्ठा काय आहे हे लवकरच तपासून पाहिलं जाईल..
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या या विधानावरून भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सर्वप्रथम त्यांना लक्ष्य केलं. त्यानंत आता चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर:
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे?
- आता पर्यंत देशातील सगळ्या अडचणींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशासाठी लढला, झिजला हे सांगायला तुम्ही लागत नाही दिलीप वळसे पाटील. हे सर्वसामान्यांना माहीत आहे.
- तुमच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मधे आणू नका.