मुक्तपीठ टीम
तुम्ही मुंबई किंवा नागपूरमध्ये असाल तर तुम्ही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’मधील खाद्यपदार्थांचा आस्वाद नक्की घ्या. कारण रेल्वेने त्यासाठी मस्त शानदार सोय केली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ची अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ती नागपुरातही राबवली. सर्वात महत्वाचं म्हणजे येथे तुम्हाला वेळ पाहून जावे लागणार नाही. कारण ही सुविधा तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा २४ तास जेवणाची ही सुविधा उपलब्ध असेल. सध्या काही रेल्वे स्थानकावर असलेली ही सुविधा लवकरच आणखी जास्त रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होईल.
‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ आहे तरी कसं?
- ‘‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’’ सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर स्थानकात आहे.
- तेथे आपल्याला २४ तास सेवा मिळू शकते.
- मध्य रेल्वेची भविष्यात आणखी काही स्थानकांवर ‘‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’’ सुरू करण्यात येतील.
- चवदार जेवणाच्या शौकिन खवैयांसाठी हा एक शानदार अनुभव आहे.
- मध्य रेल्वेने हे रेस्टॉरंट ट्रेनच्या डब्यातच बनवले आहे.
- हे रेस्टॉरंट रेल्वेच्या अशा डब्यात बांधण्यात आले आहे जे यापुढे प्रवासी वाहून नेण्यासाठी योग्य नाही.
- रेल्वेचे हे अनोखे रेस्टॉरंट या भागातील लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय रेस्टॉरंट डेस्टिनेशन बनतेय.
लवकरच पश्चिम रेल्वेवरही सुविधा
- ही सुविधा लवकरच पश्चिम रेल्वेच्या इतर स्थानकांवर उपलब्ध होईल.
- रेल्वेच्या म्हणण्यानुसार, चाकांवरील रेस्टॉरंट खूप पूर्वी सुरू होणार होते, परंतु चक्रीवादळ गुलाबमुळे डब्याची बाह्य सजावट अपूर्ण राहिली.
- मध्य रेल्वेने अलीकडेच सुरु केलेल्या पहिल्याम ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’मधून रेल्वेला वर्षाला ४२ लाख रुपये मिळतील.
- प्रवाशी सेवापेक्षा अन्य मार्गानेही उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेने ही अनोखी पद्धत अवलंबली आहे.
शानदार सेवा, पण परवडणाऱ्या किंमती!
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या शेवटी (P D’Mello Road Entrance) येथे लोक ट्रेनच्या डब्यात स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतील.
- ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’च्या मेनूमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खाद्यपदार्थांच्या किंमती बाहेरील रेस्टॉरंटच्या तुलनेत कमी ठेवण्यात आल्या आहेत.
- मोबाईल फूड अॅपवर अन्न विकण्याची सुविधा रेल्वे कोच रेस्टॉरंटकडूनही दिली जाईल.
- अशा प्रकारे लोक ऑनलाईन ऑर्डर देऊन अन्न घेऊ शकतील.
- फ्रीवेचा वापर रेल्वेच्या रेस्टॉरंट्स ऑन व्हील्सला सहज कनेक्टिव्हिटी देण्यासाठी केला गेला आहे.
लोक बाहेरूनही येऊ शकतात
- ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’मध्ये २४ तास सेवा, एका वेळी ४० लोकांची आसन क्षमता आहे.
- या रेस्टॉरंटमध्ये केवळ रेल्वे प्रवासीच नाही तर बाहेरून आलेले लोकही येऊन जेवू शकतात.
- ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ कॉन्टिनेंटल, दक्षिण भारतीय, पंजाबी आणि गुजराती विविध पाककृती उपलब्ध आहेत.
- देशाच्या विविध भागांतील प्रसिद्ध खाद्यपदार्थ या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहेत.
नागपुरातही चांगला प्रतिसाद
३ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर रूळांवर बसवलेल्या रेल्वे डब्यात रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या डबा सुशोभित करताना नागपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे. तसेच कोचचा मूळ रंग आणि डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये १० टेबल आहेत. तेथे ४० ग्राहक बसू शकतात. आतापर्यंत अंदाजे ३०,००० पर्यटक येथे आले आहेत.
आता महाराष्ट्रात ८ आणखी रेस्टॉरंट उघडणार!
मुंबई विभागातील लोकमान्य टिळक टर्मिनस, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी स्थानकांवर आणि पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवर अशाच प्रकारची रेस्टॉरंट्स सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. हे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ थीम हे प्रवासी-अनुकूल उपक्रमांसह महसूल निर्मितीच्या नवीन कल्पनांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.