मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे भारतीय रेल्वेने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात कपात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटची किंमत ५० रुपयाहून १० रुपये केली आहे. त्याचबरोबर लसीकरण झालेल्या लोकल प्रवाशांना रेल्वेने विशेष सुविधा दिली आहे.
आता यूटीएस मोबाइल अॅपवर तिकिटाची सोय!
- रेल्वेने यूटीएस मोबाइल अॅप महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी जोडले आहे, ज्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकल प्रवाशांना त्यांच्या फोनवर तिकीट बुक करता येईल.
- UTS अॅप आधीपासूनच Android साठी उपलब्ध आहे. लोकल ट्रेन पाससाठी UTS अॅपची या सुविधेचा गुरुवारपासून उपयोग केला जात आहे.
मुंबई लोकल ट्रेनच्या आठ नवीन एसी सेवा सुरू झाल्या
- दुसरीकडे, पश्चिम रेल्वे (WR) मुंबईत सोमवारपासून आणखी आठ एसी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या असून, एकूण लोकल गाड्यांची संख्या २० झाली आहे.
- या आठ नवीन सेवांपैकी चार ‘अप’ आणि ‘डाऊन’ दिशेने आहेत आणि दोन ट्रेन गर्दीच्या वेळेत धावतील.
- नवीन ट्रेन्सपैकी एक अधिकृतपणे विरार आणि चर्चगेट स्थानकादरम्यान, दोन बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान आणि एक गोरेगाव आणि चर्चगेट दरम्यान धावेल.
- दरम्यान, ‘डाऊन’ दिशेने एक लोकल चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान, दोन चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान आणि एक चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान धावेल.