मुक्तपीठ टीम
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात स्टेनोग्राफर सहाय्यक उपनिरिक्षक या पदासाठी १२२ जागा, मंत्रिपद हेड कॉन्स्टेबल या पदासाठी ४१८ जागा अशा एकूण ५४० जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने होत असून अधिकृत लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
स्टेनोग्राफर सहाय्यक उपनिरीक्षक आणि मंत्रिपद हेड कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवाराला १२वी उत्तीर्ण, हिंदी आणि इंग्रजी भाषेत टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करताना शुल्काविषयीची माहिती ही अधिकृत वेबसाईटद्वारे जाणून घ्यावी.
अधिक माहितीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cisf.gov.in/cisfeng/ वरून माहिती मिळवू शकता.