मुक्तपीठ टीम
केंद्र सरकार हे दडपशाहीचं सरकार आहे. विरोधकांवर दडपशाहीचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. त्यामागे महागाईपासून लक्ष भरकटवण्याचाही प्रयत्न आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधातील ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशन पेन ड्राइव्हवरही टीका केली. आजकाल कागद नसतात पेन ड्राइव्ह दाखवले जातात. त्या पुढे म्हणाल्या की केंद्रीय यंत्रणा जराही स्वायत्त राहिलेल्या नाहीत. पूर्वी आमचे नवाबभाई बोलायचे आता संजय राऊतजी बोलतात. आधी काही भाजपा नेते नावं घेतात. त्यानंतर केंद्रीय यंत्रणांची कारवाई होते. अशा किमान सात-आठ केसेस झाल्या.
खासदार सुळे यांनी अशा कारवाई जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहीमेतून होत असत्या तर मी स्वागतच केले असते असेही म्हणाल्या. पण तसं होताना दिसत नाही. अशा कारवाई निवडूनच होत आहेत, असेही त्या म्हणाल्या.