Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिशाला आग, सरकारी तिजोरीत महसुलाचा महापूर!

July 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
petrol (2)

मुक्तपीठ टीम

दोन महिन्यांपूर्वी पाच राज्यामंध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर देशात गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ सातत्यानं सुरू आहे. देशाच्या महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलने शंभरीपार केलं आहे. आर्थिक वर्षाच्या २०२०-२१मध्ये पेट्रोलियम उत्पादनांवरील सीमा शुल्क उत्पादन शुल्काच्या माध्यमातून केंद्र सरकारने प्रचंड कमाई केली आहे. अप्रत्यक्ष करातून सरकारला मिळणारा महसूल सुमारे ५६.५% टक्क्यांनी वाढून ४.५१ लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. म्हणजेच एकीकडे इंधन दरवाढीमुळे महागाईचा वणवा भडकून सामान्य माणसांच्या खिसा कापलाच जात नसून त्याला आग लागत असतानाच दुसरीकडे सरकारच्या तिजोरी मात्र महसुलाच्या महापुरामुळे ओसंडून वाहत आहे.

 

४.१३ लाख कोटी रुपये केंद्रीय उत्पादन शुल्कातून

  • २०२०-२१ आर्थिक वर्षात पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीमधून सरकारला ३७,८०६.९६ सीमा शुल्क मिळालं.
  • त्याचबरोबर देशात या उत्पादनांच्या निर्मितीवर केंद्रीय उत्पादन शुल्काच्या रुपात ४.१३ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.
  • २०१९-२० मध्ये सरकारला पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर सीमा शुल्काच्या रुपात ४६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
  • त्याच वेळी, देशात या उत्पादनांच्या निर्मितीवर केंद्रिय उत्पादन शुल्क म्हणून सरकारनं २.४२ लाख कोटी रुपये वसूल केले होते.

 

माहिती अधिकारातून मिळाली माहिती

  • कर तिजोरीत जमा झालेल्या रकमेची माहिती मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर यांनी शेअर केली आहे.
  • याबाबत त्यांनी आरटीआयमार्फत अर्थ मंत्रालय आणि डेटा व्यवस्थापन महानिदेशालय (डीजीएसडीएम) कडे माहिती विचारला होता.
  • पेट्रोल आणि डिझेलवरील कर आणि उपकर कमी करण्याची जोरदार मागणी होत असताना ही माहिती समोर आली आहे.

 

एक जुलै रोजी वाढली २५ रुपयांनी गॅस सिलिंडर महागाई!

गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ-

  • एक जुलै रोजी सरकारी कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत.
  • यावेळी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे.
  • आता मुंबईत १४.२ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८३४ रुपये ५० पैसे झाली आहे.
  • ३०जूनपर्यंत मुंबईत १४.२ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये होती.

 

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी कराव्यात, वाढवायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतात. यापूर्वी एक मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली होती. तेल कंपन्यांनी एप्रिलमध्ये गॅस सिलिंडरच्या किंमतीत दहा रुपयांची कपात केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एलपीजी सिलिंडर महाग झाले


Tags: central govtPetroleum Productsपेट्रोल-डिझेलपेट्रोलियम उत्पादन
Previous Post

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारवरच! आता संभ्रमाचं राजकारण थांबवा, संयमाचा अंत नको!

Next Post

“सर्वांसाठी घरे” या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती: एकनाथ शिंदे

Next Post
eknath shinde

"सर्वांसाठी घरे" या सिडकोच्या ध्येयाची वचनपूर्ती: एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!