Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतीय चॅनल्ससाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे: आता टीव्ही चॅनल्ससाठी सुलभता, पण रोज अर्धा तास सार्वजनिक हिताच्या कार्यक्रमांसाठी सक्तीचा वेळ!

November 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
TV Channels

मुक्तपीठ टीम

“भारतातील उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंग संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, २०२२” ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता टीव्ही चॅनल्ससाठी सुलभता होणार आहे. पण रोज अर्धा तास देशहिताच्या कार्यक्रमांसाठी सक्तीचा वेळही ठेवावा लागणार आहे.

एकत्रित मार्गदर्शक तत्त्वांमुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांचे अपलिंकिंग आणि डाउनलिंकिंग, टेलिपोर्ट/टेलिपोर्ट हबची स्थापना, डिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग (DSNG)/ सॅटेलाइट न्यूज गॅदरिंग (SNG)/ इलेक्ट्रॉनिक न्यूज गॅदरिंग प्रणालीचा वापर , भारतीय वृत्त संस्थांद्वारे अपलिंक आणि थेट कार्यक्रमाचे तात्पुरते अपलिंक यासाठी भारतात नोंदणीकृत कंपन्या/ मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी ) ना परवानग्या जारी करणे सुलभ होईल.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी अनुपालन सुलभ
कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणासाठी पूर्व परवानगी आवश्यक नाही
भारतीय टेलिपोर्ट्स परदेशी वाहिन्या अपलिंक करू शकतात
राष्ट्रीय/जनहितार्थ आशय प्रसारित करणे बंधनकारक
सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे : –

1. परवानगी धारकासाठी अनुपालन सुलभ

अ) कार्यक्रमांच्या थेट प्रक्षेपणासाठी पूर्वपरवानगीची अट रद्द करण्यात आली आहे; थेट प्रक्षेपण करण्‍यासाठी कार्यक्रमांची केवळ पूर्वनोंदणी करणे आवश्‍यक असेल;

ब) भाषा बदलण्यासाठी किंवा स्टँडर्ड डेफिनिशन (SD) वरून हाय डेफिनिशन (HD) किंवा त्याउलट प्रसारण पद्धतीत बदल करण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही; केवळ पूर्व सूचना आवश्यक असेल.

क)आपत्कालीन परिस्थितीत, केवळ दोन संचालक/ भागीदार असलेल्या कंपनी / मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी ) यांच्यासाठी संचालक/ भागीदार बदलता येऊ शकतो , मात्र व्यवसाय संबंधी निर्णय घेण्यासाठी अशा नियुक्तीनंतर सुरक्षा विषयक मंजुरी आवश्यक असेल

ड ) एखादी कंपनी/ मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी ) या बातम्यांचे संकलन करण्यासाठी +ै२े्डीएसएनजी व्यतिरिक्त अन्य उपकरणे , उदा. ऑप्टिक फायबर, बॅग बॅक, मोबाईल इ. वापरू शकतात , यासाठी वेगळी परवानगी घेणे आवश्यक नाही.

2. व्यवसाय सुलभता

परवानगी देण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा प्रस्तावित करण्यात आली आहे; मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी ) संस्था देखील परवानगी घेऊ शकतात; एलएलपी/कंपन्यांना भारतीय टेलिपोर्टवरून परदेशी वाहिन्या अपलिंक करण्याची परवानगी दिली जाईल, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि भारत इतर देशांसाठी टेलिपोर्ट-हब बनेल वृत्तसंस्थेला सध्याच्या एका वर्षाच्या तुलनेत 5 वर्षांच्या कालावधीसाठी परवानगी मिळू शकते; सध्याच्या केवळ एक टेलिपोर्ट/सॅटेलाइटच्या तुलनेत एकपेक्षा जास्त टेलिपोर्ट/सॅटेलाइटच्या सुविधा वापरून चॅनेल अपलिंक करता येऊ शकते; कंपनी कायदा/मर्यादित दायित्व भागीदारी कायद्यानुसार परवानगी असलेल्या कंपनी/एलएलपीला टीव्ही चॅनल/टेलिपोर्ट हस्तांतरित करण्याची परवानगी देण्याची शक्यता यामुळे वाढली आहे.

3. सरलीकरण आणि तर्कसंगतता

दोन स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वांची जागा मार्गदर्शक तत्त्वांच्या एका संयुक्त संचाने घेतली आहे;
मार्गदर्शक तत्त्वांची पद्धतशीर रचना करताना डुप्लिकेशन आणि सामान्य घटक टाळले जातील हे पाहिले आहे.
दंड संबंधी कलमे तर्कसंगत करण्यात आली आहेत आणि सध्याच्या एकसमान दंडाऐवजी निरनिराळ्या उल्लंघनांसाठी वेगळ्या स्वरूपातील दंड प्रस्तावित आहे.

4. अन्य वैशिष्ट्ये :

चॅनेल अपलिंक आणि डाउनलिंक करण्याची परवानगी असलेल्या कंपन्या/एलएलपी राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि सामाजिक प्रासंगिकतेच्या संकल्पनेवर दिवसभरात किमान 30 मिनिटांसाठी सार्वजनिक सेवा प्रसारण (जेथे ते शक्य नसेल ते वगळता) करू शकतात.
सी बँड व्यतिरिक्त फ्रिक्वेन्सी बँडमध्ये अपलिंक करणार्‍या दूरचित्रवाणी वाहिन्यांनी त्यांचे सिग्नल एनक्रिप्ट करणे अनिवार्य आहे.
नूतनीकरण करताना कंपन्या/एलएलपीमधील निव्वळ मूल्य ( भांडवल)विषयक परवानग्या; त्या त्या वेळच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार.
थकित रकमेची परतफेड सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा ठेवींची तरतूद.

सविस्तर मार्गदर्शक तत्वे पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा…

MIB channels guidelines 2022


Tags: central govtDSNGSNGकेंद्र सरकारडिजिटल सॅटेलाइट न्यूज गॅदरिंगभारतातील उपग्रह दूरचित्रवाणी वाहिनासॅटेलाइट न्यूज गॅदरिंग
Previous Post

राज्याचे फुटवेयर आणि लेदर धोरण महिनाभरात बनणार – उदय सामंत

Next Post

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन

Next Post
Rajiv Kumar

उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!