मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मार्चमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर महाराष्ट्र दिल्ली आणि केरळमधील राज्य सरकारकजून केंद्र सरकारकडे कोरोना लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. आता अखेर केंद्र सरकारने कोरोना लसीच्या १२ कोटी लसींच्या डोसची मागणी नोंदवली आहे.
जास्त लस पुरवण्याचे आदेश
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि भारत बायोटेकला लशींचा पुरवठा त्वरित वाढवण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग भयावह पद्धतीने वाढला आहे.
१ मार्चपासून देशभरातील सामान्य लोकांना लस देण्याची मोहीम सुरू आहे. त्यामध्ये, ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना ही लस दिली जात आहे.