मुक्तपीठ टीम
भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत १२ डिसेंबर रोजी इंडिया गेट येथे होणाऱ्या विजय पर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. या विशेष महोत्सवाची त्यांची तयारीही विशेष म्हणावी अशीच होती. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी ते संपूर्ण देशाला आवाहन करणार होते. त्यासाठी जनरल रावत यांनी व्हिडीओ संदेशही रेकॉर्ड केला होता. आज ते आपल्यात असते तर त्यांनी जनतेला संबोधित करत आपला संदेश दिला असता.
Tiger’s Last Public Message !
General Bipin Rawat’s this message was recorded the evening before the helicopter crash. It was to be telecasted/played today morning as part of the 1971 War Vijay Diwas Event. pic.twitter.com/ctlP20eT3i— Major Surendra Poonia (@MajorPoonia) December 12, 2021
विजय पर्वसाठी रेकॉर्ड केलेला सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा व्हिडीओ संदेश
- सुवर्ण विजय पर्वानिमित्त, मी भारतीय सैन्यातील सर्व शूर सैनिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.
- १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याच्या विजयाचा ५०वा वर्धापन दिन आम्ही विजयपर्व म्हणून साजरा करत आहोत.
- या पवित्र दिनाच्या दिवशी सशस्त्र दलातील शूर जवानांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला मी आदरांजली अर्पण करतो.
- १२ ते १४ डिसेंबर दरम्यान इंडिया गेट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- अमर जवान ज्योतीच्या छायेत विजय पर्व आयोजित केले जात आहे ही भाग्याची गोष्ट आहे.
- ज्याची स्थापना आपल्या शूर शहीदांच्या स्मरणार्थ करण्यात आली.
- या विजयोत्सवाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही देशातील सर्व नागरिकांना आमंत्रित करतो.
- आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे.
- चला एकत्र विजय साजरा करूया. जय हिंद!
राजनाथ सिंह जनरल बिपिन रावत यांच्या स्मर्णार्थ
इंडिया गेटवर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ‘सुवर्ण विजय वर्ष’ निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “हा कार्यक्रम अधिक भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे जाणे अकाली झाले. त्यांच्या मृत्यूनंतर विजय पर्व साधेपणाने साजरे करायचे ठरवले आहे. त्यानिमित्त मी त्यांना स्मरण करून आदरांजली वाहतो.
#VijayParv #VijayParv celebrations were inaugurated by the #RakshaMantri Shri Rajnath Singh at #IndiaGate Lawns today. To commemorate the golden jubilee of #1971War victory, the celebrations would be conducted over two days at #NewDelhi from 12 to 13 Dec 21. pic.twitter.com/KsncWRe7Ok
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) December 12, 2021
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ‘सुवर्ण विजय वर्ष’ अंतर्गत आयोजित ‘विजय पर्व’ साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण इंडिया गेट येथे जमलो आहोत, असे ते म्हणाले. हा सण भारतीय सैन्याच्या गौरवशाली विजयाचे स्मरण करतो, ज्याने दक्षिण आशियाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या विधानाची कदाचित तुम्हा सर्वांना माहिती असेल, ज्यात त्यांनी ‘कुठेही अन्याय हा सर्वत्र न्यायाला धोका आहे’ असे म्हटले होते.
या दिवशी मी भारतीय लष्कराच्या प्रत्येक जवानाच्या शौर्य, बलिदानाला नमन करतो, ज्यामुळे भारताने १९७१ चे युद्ध जिंकले होते. त्या सर्व वीरांच्या त्याग आणि बलिदानाचा हा देश सदैव ऋणी राहील.
ते म्हणाले की, “या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य जनता १९७१ च्या युद्धातील यश आणि प्रेरणांशी स्वत:ला जोडू शकतील आणि राष्ट्राप्रती असलेले कर्तव्य नव्या पद्धतीने आत्मसात करू शकतील, अशी मला केवळ आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे.”
संरक्षण मंत्री म्हणाले की, “मला आनंद होत आहे की या महोत्सवात देशातील सामान्य जनतेला सहभागी करून घेण्यासाठी, त्यांना १९७१ च्या युद्धाची माहिती देण्यासाठी, आपल्या सैन्याच्या आतापर्यंतच्या प्रगतीची माहिती देण्यासाठी एक भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. आमचे सशस्त्र दल कोणत्याही प्रसंगासाठी सज्ज ठेवणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत. ‘विजय पर्व’ सारखे उत्सव आपल्याला या मार्गावर वेगाने वाटचाल करण्याची प्रेरणा देतात.”