मुक्तपीठ टीम
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत पाहता केंद्र सरकारने यंदा सीबीएसईची परीक्षा रद्द केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हवाला देऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द करण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणाऱ्या याचिकाकर्त्या ममता शर्मा यांनी आता पुढील ऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आता सर्व राज्यांमधील परीक्षा रद्द कराव्या आणि मुलांच्या करिअरचा विचार करत १५ जुलैपूर्वी निकाल जाहीर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहेत.
ममता शर्मांचा आता इतर बोर्डांच्या मुलांसाठी लढा
• अॅड ममता शर्मा यांनी सांगितले की, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सर्व राज्यांच्या परीक्षांसाठीही लागू झाला पाहिजे.
• आता सीबीएसईच्या दीड कोटी मुलांनंतर आता त्या इतर बोर्डांच्या मुलांसाठीही लढणार आहेत.
• सर्व राज्यांनी १५ जुलैपूर्वी निकाल जाहीर करावा, जेणेकरुन परदेशात अभ्यासासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हे वर्ष वाया जावू नये, अशीही मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहेत.