मुक्तपीठ टीम
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या ३०० विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांना पत्र लिहिले आहे. कोरोना महामारीचा विचार करुन सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
कोरोना साथीच्या काळात सीबीएसईने शारीरीक उपस्थितीत म्हणजेच ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला पाहिजे. त्याऐवजी पर्यायी मूल्यांकन व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. न्यायालयाने तसे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे.
विद्यार्थ्यांनी पत्रात मांडलेले मुद्दे
• कोरोना महामारीच्या साथीच्या वेळी शारीरिकदृष्ट्या परीक्षा घेणे केवळ अन्यायकारकच नाही तर, एक अव्यवहारिक देखील आहे.
• जर शारीरिक स्वरूपात म्हणजेच ऑफलाइन परिक्षा घेतली तर, लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांचे जीवन, आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात येईल.
• २५ मे रोजी देशात नोंदवलेल्या कोरोनाबाधित नव्या रुग्णांची माहिती दिली आहे.
• साथीच्या आजारामुळे आतापर्यंत बर्याच विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी आपले प्राण गमावले आहेत.
• अशा परिस्थितीत जेव्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होते, तर घरात राहणे हा एकच पर्याय उरतो.
दीड कोटी विद्यार्थी तणावात
• परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनिश्चिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रगती करण्याऐवजी मागे पडले आहेत.
• सीबीएसई १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख ३० हजारांपेक्षा जास्त आहे.
• दुसरीकडे, जर सर्व राज्य मंडळांचे विद्यार्थी विलीन केले गेले तर जवळजवळ एकूण विद्यार्थ्यांची संख्या दीड कोटी आहे.