Uncategorized

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com टॉप १० व्हायरल बातमीपत्र रविवार, २१ मार्च २०२१   अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या आरोपांवर शरद पवार काय बोलले?...

Read more

गुन्हे महत्वाचे : 1)घरात एकट्या राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेला मारहाण करत तिची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराचा शोध सुरू केला. 2)कणकवलीतील पटवर्धन चौकात ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांना पेट्रोल अंगावर ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणाला ताब्यात घेतले आहे. 3)शहरातील विविध भागांत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी तब्बल अडीचशे सीसीटीव्ही पाहून पकडले. त्याच्याकडून साडेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 4)एका तरुणाने तीन पाळीव कुत्र्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापुरातील एका ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 5)डोंबिवलीत महिलेच्या हत्येप्रकरणी कल्याण क्राईम ब्रांचने आरोपीला 16 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. मयत महिला ही बारबाला असून बारच्या वेटरनेच तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वेटरने बारबालासोबत शारीरिक संबंध केले. त्यानंतर बारबालाची हत्या केली. हत्येनंतर वेटरने बारबालाच्या घरातील सामान चोरी केली आणि तो पसार झाला.

Read more

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

आज आठवड्यातील निवडक सर्वोत्तम चांगल्या बातम्यांचं मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र रविवार, २१ मार्च २०२१   टोलनाकेच नसणार, गाडी...

Read more

*मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीच्या घरी काही महिन्यांपूर्वी एका नव्या पाहुणीचे आगम झाले. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनिमित्त भारतीय क्रिकेट संघाची संपूर्ण टीम अहमदाबद येथे हॉटेलमध्ये थांबली आहे. त्यामुळे येथे प्रत्येकाच्या खोलीला नेमप्लेट देण्यात आले आहे. यात विराट कोहलीच्या खोलीबाहेर त्याची पत्नी अनुष्का, त्याचे आणि मुलगी वामिकाचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत. २) अभिनेता अभिषेक बच्चन याचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. ३) अभिनेता ऋषी सक्सेना याची ‘गुडबॉय’ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या नव्या वेब सीरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरिजबद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. ४) अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाच्या शूटिंगची सुरूवात करण्यासाठी अक्षय कुमार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा हे अयोध्येला रवाना झाले आहेत. ५) आता अभिनेत्री मोनी रॉय लवकरच तिचा बॉयफ्रेण्ड सूरज नंबियार याच्यासोबत लग्नबंधनात अडकरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मौनी तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मोनी रॉयने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सूरुज आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

Read more

जनरल बातम्या : 1) टाटा मोटर्स कंपनीने रुग्णांची वाहतूक करणारी मॅजिक एक्स्प्रेस नावाची अँब्युलन्स लॉन्च केली आहे. कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली. ही मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.ही अँब्युलन्स एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करते. 2)सध्या बाजारात सोने अधिक स्वस्त होत आहे आणि त्यामुळेच सराफा बाजारात ही सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६३०० रुपयांवर पोहचली होती.सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २०२१ च्या वर्षात सोने ६००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी बाजार बंद झाला होता त्या वेळी सोन्याचा भाव ४४७८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामध्ये ९४ रुपयांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सोन्याचा ४४२७१ रुपयांपर्यंत खाली आला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६८९५ रुपये होता त्यात घसरण होवून ६५० रुपये किंमत झाली.आणि त्यामुळेच चांदीने ही ६५९३३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. 3) कोराना लसीमुळे कोराना पुन्हा संपण्याच्या मार्गावर येत होता आणि यामुळेच सरकारने पुन्हा बंद पडलेल्या कामधंद्यांना काही अटी नियमंसोबत सुरुवात करण्यास परवानगी दिली होती.परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाच प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला.मध्य प्रदेशातही गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे.आणि त्यामुळे प्रशासनानं निर्बंध कठीण करण्याचा निर्णय घेतलाय.राज्यातील इंदूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी तर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल, असे आदेश केले आहेत.

Read more

गुन्हे महत्वाचे : 1)औषध आणण्यासाठी मेडिकलला चाललेल्या एका वृद्धेला भर रस्त्यात लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धेची दिशाभूल करून तिला बाजूला नेले. तिथे वृद्धेच्या तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या हातातील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या बळजबरीने काढून नेल्या. 2) नवी मुंबईमधील बिखी कल्पेश परमार या विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा व सासऱ्यास अटक केली आहे. बिखीने तिच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरे व दिराविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 3) न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करून गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी, पाच हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील दोन लाचखोर हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नारेगाव पोलिस चौकीत रंगेहाथ ताब्यात घेतले. 4)धुतूम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायो डिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. टँकर क्रमांक एम एच ४३ वाय ८१५१ क्रमांकाचा टँकर बायोडिझेल घेऊन धुतूम येथील हिंदुस्थान कंटेनर यार्ड मध्ये बायो डिझेलचा टँकर आढळून आला. हा टँकर कोणाचा आहे आणि ह्या यार्डमध्ये काय करतोय? कंटेनर यार्डचे व्यवस्थापक कोण आहे? यार्डचे मालक कोण आहे? विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी ह्याचे उत्तर दिले नाही.

Read more

गुन्हे महत्वाचे: 1)मालाड कुरार परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका सिव्हिल इंजिनिअरला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडून 63 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना छाप्यात गांजाच्या तीन गोण्या मिळाल्या.बाजारपेठेत या गांजाची किंमत जवळपास ९ लाख इतकी आहे. 2)सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झालाय. एका बस स्थानकावर त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मृत महिलेच्या पतीने पत्नीचे एका पोलीस उपनिरिक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केलाय. दुसरीकडे पोलिसांनी मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. त्यामुळेच ही आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातच त्यांच्या मृत्यूमागील खरं कारण समजू शकणार आहे. 3) मागील काही वर्षांमध्ये मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळला गेला नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांत राज्यात एक लाख ३८ हजार बालकांनी प्राण गमावले आहेत. कुटुंबकल्याण, माता बाल संगोपन विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२०-२१ या सात वर्षांच्या कालावधीमध्ये राज्यातील ० ते ५ या वयोगटातील एक लाख ३८ हजार ५७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 4)टीआरपी घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी मोठी कारवाई केली. त्याअंतर्गत तब्बल ३२ कोटी रुपयांची मालमत्ता चार शहरांमधून जप्त करण्यात आली आहे. तीन वाहिन्यांच्या मालमत्तेचा त्यात समावेश आहे. 5)वसईच्या उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एनजीओच्या नावाखाली हे सेक्स रॅकेट चालवले जायचे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Read more

महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट पुणे जिल्हा एकूण          ४७२४ पुणे       ०९०६ पुणे मनपा २,६१२ पिंपरी चिंचवड मनपा १,२०६ नागपूर जिल्हा एकूण       ३,४०५ नागपूर       ०,७०७ नागपूर मनपा २,६९८ मुंबई मनपा               २,३७७ (शहरे+उपनगरे २ जिल्हे) नाशिक जिल्हा एकूण       २,१२६ नाशिक       ०५१८ नाशिक मनपा १,४९० मालेगाव मनपा ०,११८ ठाणे जिल्हा एकूण         १,९५२ ठाणे       ०२३७ ठाणे मनपा ०५१६ नवी मुंबई मनपा ०३६७ कल्याण डोंबवली ०६३७ उल्हासनगर मनपा ००६४ भिवंडी निजामपूर ००२४ मीरा भाईंदर मनपा ०१०७ औरंगाबाद जिल्हा एकूण     १,१४५ औरंगाबाद ०१६६ औरंगाबाद मनपा ०९७९ नगर जिल्हा एकूण         ०६०२ अहमदनगर ०४३८ अहमदनगर मनपा ०१६४ जळगाव जिल्हा एकूण       ०५७० जळगाव ०३८४ जळगाव मनपा ०१८६ बुलढाणा जिल्हा एकूण      ०५३२

Read more

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, १७ मार्च २०२१ आज राज्यात २३,१७९ नवीन रुग्णांचे निदान. आज ९,१३८ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण १,५२,७६० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.२६ % एवढे झाले आहे. राज्यात आज ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,७३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read more
Page 15 of 23 1 14 15 16 23

ताज्या बातम्या

error: Content is protected !!