Uncategorized गायरान जमीन वाटप प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा! – अजित पवार December 29, 2022
Uncategorized माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल December 28, 2022
Uncategorized गुन्हे महत्वाचे : 1) एकाच कुटुंबाती तीन महिलांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ५४ हजार रुपयांची रोख रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्यावर आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 2)बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबईच्या उपनगरी भागातील ग्राहकांना ड्रग्ज पुरवणाऱ्या विद्यार्थ्याला एनसीबीने अटक केली. विद्यार्थ्याला बेड्या ठोकण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घाबरवण्यासाठी बिलंदर आरोपीने त्यांच्यावर कुत्रे सोडले. 3)नांदेडमधील पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात अवघ्या न्यायालयाने 64 दिवसांत शिक्षा सुनावली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेला पळवून नेऊन अत्याचार करत खून केल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. 4) एका महिलेची रात्रीच्या सूमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. दोन दिवसात या हत्येचा उलगडा करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आलं आहे. एका तरुणाचे या महिलेच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र या महिलेने या प्रेम सबंधास विरोध केल्याने या तरुणाने या महिलेची गळा चिरून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या कटात अल्पवयीन मुलगी देखील सहभागी होती. दिलजीत यादव असं या आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर जन्मदात्या आईच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 वर्षीय मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. 5)पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहाणाऱ्या सागर चौधरी (२८) या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सागरने आत्महत्येपूर्वी प्रेयसीला व्हॉटसअॅपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज केल्याचे तपासात आढळले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी सुष्मिता यादव या तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. by Apeksha Sakpal March 25, 2021 0 Read more
Uncategorized महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, २३ मार्च २०२१ आज राज्यात २८,६९९ नवीन रुग्णांचे निदान. आज १३,१६५ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात सध्या एकूण २,३०,६४१ सक्रिय रुग्ण आहेत राज्यात आजपर्यंत एकूण २२,४७,४९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.७३ % एवढे झाले आहे. राज्यात आज १३२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . १३२ मृत्यूंपैकी ७४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८५,८४,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५,३३,०२६ (१३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,७७,२६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. by Tulsidas Bhoite April 9, 2021 0 Read more
Uncategorized *मनोरंजन महत्त्वाचे*: 1. दिग्दर्शक केदार शिंदे एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर अतिशय वेगळ्या अंदाजात प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. 2. अभिनेत्री आणि सर्वांची आवडती सूत्रसंचालक पल्लवी जोशीला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘द ताश्कंद फाइल्स’, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर आधारित या चित्रपटातील भूमिकेसाठी पल्लवीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 3. सध्या दिल्लीत झालेल्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. धनुष याला असुरनमधील अभिनयासाठी आणि मनोज बाजपेयी यांना भोसले या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 4. अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर हीला लवकरच करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या माध्यमातून लॉन्च करणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबाबत करण जोहरने ही माहिती दिली आहे. 5. सध्या चर्चेत असणारी झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘देवमाणूस’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. २१ मार्च रोजी या मालिकेचा दोन तासांचा भाग प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे ही मालिका संपतेय की काय? हा प्रश्न पडला आहे. by Rohini Thombare March 24, 2021 0 Read more
Uncategorized गुन्हे महत्वाचे : 1) मुंबईत विविध ठिकाणी बनावट शाईचा पुरवठा करणाऱ्यांची आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने पोलखोल केली आहे. पोलिसांनी अँटॉप हिल येथील एका खोलीमध्ये छापा टाकून सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. ॲपसॉन, कॅनन यांसारख्या नामांकित कंपन्यांची लेबल्स लावून ही बनावट शाई झेरॉक्स, स्टेशनरी तसेच इतर दुकाने आणि कार्यालयांना पुरवली जात होती. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. 2)पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील पतीला ठाणे न्यायालयाने १० वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेपैकी चार लाख रुपये भरपाई म्हणून पीडित महिलेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा प्रकार ११ वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये घडला. 3)नोकरी लावण्याच्या बहाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर भागात दोन तरुणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन्ही तरुणांना अटक करण्यात आली. 4)मोबाईलची स्क्रिन तुटल्यानंतर विमा कंपनीकडून पैसे मिळावे यासाठी महिलेने प्रचंड शक्कल लढवली. मात्र, विमा कंपनीच्या निकषात ते बसत नसल्याने विमा कंपनीकडून मोबाईलची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलेने विमा कंपनीकडून नवा मोबाईल मिळावा यासाठी विचित्र कट आखला. काही लोकांनी तिच्या हातून मोबाईल हिसकावून नेला, अशी तक्रार तिने पोलिसात दिली. मात्र, पोलिसांनी तिचा कट उधळून लावला. हा सर्व प्रकार नेमका कसा झाला, त्याचा संपूर्ण घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 5)विरारमध्ये गेल्या काही दिसांपासून सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला असता या सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींनी एकट्या विरार हद्दीत १४ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ७४ हजार ९५०,रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे. by Apeksha Sakpal March 24, 2021 0 Read more
Uncategorized क्रीड थोडक्यात: १) भारत-इंग्लंड यांच्यात रंगलेल्या पाच सामन्याची टी-२० मालिका भारताने ३-२ अशी जिंकली आहे. एकीकडे विजयाचा आनंद साजरा केला जात आहे, तर दुसरीकडे भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. शेवटच्या सामन्यात निर्धारित वेळेत भारतीय संघाने दोन षटके कमी टाकल्याने संघाच्या मानधनामधील ४० टक्के दंड आयसीसीच्या एलिच पॅनेलचे मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ठोठावला आहे. तर संघाचा कर्णधार विराट कोहलीने संबंधित कारवाई मान्य केली आहे. २) युवराज सिंग आणि युसूफ पठाण आणि गोलंदाजांच्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांने पराभव करत जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेला आपल्या नावे केली आहे. भारताने २० षटकांत ४ बाद १८२ धावाचे आव्हान दिले होते. सनथ जयसूर्याने ४३ धावा केल्या. कौशल्य वीररत्ने (३८), चिंतका जयसिंघे (४०) यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला ७ बाद १६७ धावाच करता आल्या. ३) यंदाचे मेक्सिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या जर्मनीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यांनी आपल्या नावे केला आहे. ज्वेरेवने अंतिम सामन्यात ग्रीसच्या आघाडीचा टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासचा ६-४, ७-६ असा धुवा उडविला. ४) आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी ही भारतीय पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले असल्याचे दिसले. १० मीटर एअर पिस्तुल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदाची कमाई केली आहे. यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. ५) दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सीए भवानी देवीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारतातची पहिली तलवारबाज असून भवानीने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यात विक्रम आपल्या नावे केला आहे. by Vrushali Kotwal March 24, 2021 0 Read more
Uncategorized #मुक्तपीठ सोमवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र by Vrushali Kotwal May 9, 2021 0 मुक्तपीठ www.muktpeeth.com टॉप १० व्हायरल बातमीपत्र सोमवार, २२ मार्च २०२१ १०० कोटींचे महावसुली प्रकरण, आता ईडीही करणार चौकशी! http://muktpeeth.com/ed-said-there-will-be-investigation-into-money-laundering/... Read more
Uncategorized गुन्हे महत्वाचे : 1)लोकलमधून विनातिकीट प्रवास करताना पकडल्या गेलेल्या एका तरुणाने तिकीट तपासनीस व आरपीएफ जवानांना धक्काबुक्की करून तसेच, धमकावून पलायन केल्याची घटना नेरुळ स्थानकात घडली. वाशी पोलिसांनी त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)अपहरण करीत पंधरावर्षीय मुलीला डांबून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या फेसबुक फ्रेण्डला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. त्याला सक्करदरा पोलिसांच्या स्वाधीन केले. 3)वीजबिल थकवल्यानं वीजजोडणी कापून गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला रेल्वे पोलिसाने आणि त्याच्या मुलाने मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केलाय 4)वेडाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मावशी व आजीचे हातपाय बांधून कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आरोपी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोहिदास चऱ्हाटे असं आरोपीचं नाव आहे. 5)घरात कोणी नसल्याची संधी साधत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस जिल्हा अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. के. ढेकळे यांनी एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. by Apeksha Sakpal March 23, 2021 0 Read more
Uncategorized महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, २१ मार्च २०२१ कोरोना बेफाम…३०हजार नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण २लाखांवर, ४८ तासात ४४ मृत्यू • आज राज्यात ३०,५३५ नवीन रुग्णांचे निदान. • आज ११,३१४ रुग्ण बरे होऊन घरी. • राज्यात आतापर्यंत एकूण २,१०,१२० सक्रिय रुग्ण आहेत. • राज्यात आजपर्यंत एकूण २२,१४,८६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ % एवढे झाले आहे. • राज्यात आज ९९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद . आज नोंद झालेल्या एकूण ९९ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ % एवढा आहे. • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८३,५६,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,७९,६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. • सध्या राज्यात ९,६९,८६७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. by Tulsidas Bhoite March 24, 2021 0 Read more
Uncategorized जनरल : १)हे वर्ष सर्वाधिक उकडायचे मानले जात आहे त्यामुळे शहरातील वाढत्या उकाड्यामुळे सर्वच प्रवासी त्रासलेले आहेत. प्रवाशांनी आता आता लोकल ट्रेन कडून एसी लोकलकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ होताना दिसत येत आहे तसेच या काळात ५२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवासाचा लाभ घेतला आहे. २) रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत असते. रिलायन्स जिओ कंपनीने नुकतीच आपल्या प्रीपेड प्लान्सला कॅटेगरीत विभागले आहे.सुपरल व्हॅल्यू, बेस्टसेलर, आणि ट्रेडिंग या कॅटेगरीमध्ये जिओने प्रीपेड प्लानचा समावेश केला आहे. १९९ रुपयांच्या किंमतीत पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान उपलब्ध केले आहे. जिओन या प्लानपैकी१९९ रुयांच्या प्लानला बेस्ट सेलर कॅटेगरीत ठेवले आहे. ३) आजकालच्या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे निसर्गाचा समतोल बिघडल्याने सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे होते.ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास गारपीट झाली व शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. आधीच करूना मुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा नुकसानीचा फटका बसला. ४) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे अशातच.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती त्या ८ राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील आठ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून यातील बहुतेक रुग्ण हे या आठ राज्यांमधील आहेत. केरळमध्येही नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पण तेथील रुग्णवाढीचा ट्रेंड अजूनही घटणाराच आहे. ५) खासदार संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनातील लेख, अग्रलेख, पत्रकार परिषदा आणि वृत्तवाहिन्यांवर मुलाखतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची भूमिका मांडत असतात.ते या सोबतच फेसबुक व ट्विटरवरही ते अनेकदा पोस्ट करत असतात.त्यांच्या सोशल मीडियातून विरोधकांवर निशाणा साधताना ते व्यंगचित्रे व शेरोशायरीवर भर देत असतात.आजही त्यांनी असाच एक शेर ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरुन आता चर्चा रंगली आहे. by Apeksha Sakpal March 24, 2021 0 Read more
Uncategorized क्रिडा थोडक्यात : १) दंगल गर्ल गीता फोगट आणि बबीता फोगाटची मामेबहीण असलेल्या रितिका फोगाटने आत्महत्या केली आहे. राज्यस्तरीय कुस्तीच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणाने झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येने कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली आहे. कुस्ती क्षेत्रात फोगाट कुटुंबाने नाव कमावलं आहे. रितिकाच्या आत्महत्येने त्यांना मोठा धक्का बसल्याचं कळत आहे. २) कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं आहे. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले आहेत. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. कोरोना नियमांचं पालन करावं अशी सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळं नऊ महिन्यांनंतर आता खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या करिअरच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन यांनी आखून दिलेल्या काही नियमांचं पालन खेळाडूंना करणं बंधनकारक असणार आहे. 3) पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने मालिका ३-२ अशी जिंकली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला मात देत असताना डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावत १३० धावांची भागीदारी साकारली. पण हे दोघे बाद झाले आणि इंग्लंडचा संघ विजयापासून दूर गेला. ४) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि निर्णायक २०-२० भारतीय संघ कसा निवडण्यात यावा, याबाबतचा सल्ला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. सचिनने एएनआइला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” भारतीय संघात फक्त युवा खेळाडूंनाच संधी द्यावी, असा विचार करता कामा नये. कारण युवा खेळाडूंपेक्षा आपल्याला सर्वोत्तम भारतीय संघ कसा निवडता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. ५) चौथ्या २०-२० सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला मैदान सोडावे लागले होते. सामन्याच्या १६व्या षटकानंतर कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता आणि त्यानंतर तो मैदानात परतला नव्हता. त्यावेळी रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. by Apeksha Sakpal March 24, 2021 0 Read more
featured हवेतील बेवड्या प्रवाशांमुळे अखेर डीजीसीए कडक भूमिकेत! विमान कंपन्यांना इशारा!! by Sushrusha Jadhav January 7, 2023 0
६व्या महिन्यात जन्म, ४०० ग्रॅम वजन, ९४ दिवस रुग्णालयात…डॉक्टरांच्या प्रयत्नांनी वजन वाढवून बाळ घरी! January 7, 2023