अपेक्षा सकपाळ
सह्याद्री प्रतिष्ठान म्हणजे केवळ महाराजांचा जयजयकार नाही तर त्यांचा इतिहास जपण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी धडपडणाऱ्या मावळ्यांची संस्था. श्रमिक गोजमगुंडे यांच्यासारख्या समर्पित दुर्गसेवकांच्या पुढाकाराने सह्याद्री प्रतिष्ठान नेहमीच वेगवेगळ्या किल्ल्यांवर नवं काही तरी घडवते. नुकतंच एक नवा इतिहास घडवला गेला तो उंदेरी गडावर.
खरंत ही संस्था आता नुसतंच इतिहासाच संवर्धन करत नाही तर दुर्गसंवर्धन क्षेत्रात इतिहास निर्माण करतोय. शतकातील मोठा इतिहासउंदेरी किल्ल्यावर घडलाय. उंदेरी किल्ल्यावर ४ ओतीव लोखंडी तोफगाडे बसवले गेले. सोपे नव्हते हे. तब्बल ४ हजार २०० किलो वजनाचे तोफगाडे. जिथे कोणतीही बोट सहज जाऊ शकत नाही, बोट लावायला धक्का नाही तिथं ते पोहचवणेच सोपे नव्हते. त्यात क्षणाक्षणाला समुद्राच्या लाटांनी बोट आदळण्याची भीती. पण सारी आव्हानं पेलत सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी हे तोफगाडे पोहचवले. उंदेरी किल्ल्यावर भंडारा उधळत तोफगाड्यांची स्थापना झाली. तोफगाडे दु्र्गार्पण करण्यात आले. भंडाऱ्याच्या उधळणीनं मोहीम फत्ते झाल्याचा जल्लोष मावळ्यांनी साजरा केला…तिथून परतनाही सर्वांच्या डोळ्यासमोर असावं ते लक्ष्य नवा किल्ला, नव्या मोहिमेचंच…