मुक्तपीठ टीम
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडमध्ये कस्टमर एजंट या पदासाठी ३३२ जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी ३६ जागा, हॅंडीमन या पदासाठी ४९४ जागा अशा एकूण ८६२ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ साठी ०९ मे २०२२, पद क्र.२ साठी १४ मे २०२२, पद क्र.३ साठी ११ मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. नोकरीचे ठिकाण चेन्नई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- पदवीधर + आयएटीए- यूएफटीएए/ आयएटीए- एफआयएटीए किंवा आयएटीए- डीजीआर/ आयएटीए- कार्गो डिप्लोमा किंवा पदवीधर +०१ वर्ष अनुभव
- पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.३- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
मुलाखतीचे ठिकाण
एअर इंडिया स्टाफ हाउसिंग कॉलनी, जीएसटी रोड, मीनमबक्कम, चेन्नई- ६०००२७
अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट aiasl.in वरून माहिती मिळवू शकता.