मुक्तपीठ टीम
जमिनीपासून आकाशापर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत आहेत. आता कॅप्टन शिवा चौहान हिची उंच भरारी पाहा. देशाच्या सुरक्षेसाठी सियाचिन ग्लेसियरच्या १५ हजार ६०० फूट उंचीवर प्रथमच महिला तैनात झाली आहे. ही भारतीय स्त्री शक्तीची ताकद आहे. आर्मी इंजिनिअर कॉर्प्सची कॅप्टन शिवा चौहान हिला सियाचीन ग्लेशियरमध्ये फ्रंटलाइन पोस्टवर तैनात करण्यात आले होते. शिवा जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर नियुक्त होणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. कॅप्टन चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कॅप्टन चौहान सोमवारी सियाचीनमधील सुमारे १५,६०० फूट उंचीवर असलेल्या कुमार चौकी येथे तीन महिन्यांसाठी तैनात करण्यात आले.
कॅप्टन चौहान यांचे राजनाथ सिंह यांचाकडून अभिनंदन…
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टन चौहान यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, अधिकाधिक महिला सशस्त्र दलात सामील होत आहेत आणि ते प्रत्येक आव्हान स्वीकारत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे.
- त्यांनी ट्विट केले आणि लिहिले की, चांगली बातमी अधिकाधिक महिला सैन्यदलात सामील होताना पाहून आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने सामोरे जाताना पाहून मला खूप आनंद होतो.
- हे एक उत्साहवर्धक लक्षण आहे.
- कॅप्टन शिवा चौहान यांना माझ्या शुभेच्छा.
सियाचीन ग्लेशियर जगातील सर्वोच्च लष्करी क्षेत्र!
- काराकोरम पर्वतरांगात सुमारे २०,००० फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वोच्च लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
- येथे सैनिकांना तीव्र थंडी आणि जोरदार वाऱ्याशी लढावे लागते.
- सियाचीन बॅटल स्कूलमध्ये एका महिन्याच्या कठोर प्रशिक्षणानंतर कॅप्टन शिवा चौहान इतर जवानांसह जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन येथे कार्यरत असलेल्या पहिल्या महिला बनल्या आहेत.
- भारतीय लष्करासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
कोण आहे शिवा चौहान?
- राजस्थानची रहिवासी असलेली कॅप्टन शिवा चौहान ही ‘बेंगल सॅपर’ अधिकारी आहेत.
- तिने आपले शालेय शिक्षण उदयपूरमधून पूर्ण केले आहे.
- उदयपूरच्या NJR इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे.
- कॅप्टन शिवा चौहान ११ वर्षांचे असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.
- आईने तिचा अभ्यास सांभाळला.
- तिला लहानपणापासूनच भारतीय सशस्त्र दलात सामील होण्याची इच्छा होती आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA), चेन्नई येथे प्रशिक्षणादरम्यान तिने अतुलनीय उत्साह दाखवला आणि मे २०२१ मध्ये तिला इंजिनियर रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले.