मुक्तपीठ टीम
फायझरची लस मुलांसाठी मंजूर होणारी जगातील पहिली कोरोना लस बनली आहे. कॅनेडियन औषध नियामक हेल्थ कॅनडाने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही लस आणण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी ही लस १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात होती. अमेरिकेत, आता फायझर-बायोएनटेक लवकरच १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे.
फायझरच्या लसीच्या चाचण्या मुलांवर जानेवारी ते मार्च या दरम्यान करण्यात आल्या होत्या. ही लस पूर्णपणे मुलांसाठी सुरक्षित आहे, असे लस फायझरने स्पष्ट केले आहे. ही १००% प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे.
कॅनडामध्ये हेल्थ रेग्युलेटरने माहिती दिली आहे की, आता ही लस १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाईल. यापूर्वी १३ एप्रिल रोजी कंपनीने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लस वापरण्यासाठी अमेरिकेतील ड्रग रेग्युलेटरकडे परवानगी मागितली होती. अमेरिकेत फायझरची लस १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये वापरण्यास परवानगी दिली जाईल.
पुढील आठवड्यात यूएस-एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत फायझरच्या लसीला मंजुरीबाबत निर्णय होईल. मंजूरी मिळाल्यास सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेन्शनच्या (सीडीसी) सल्लागार समितीची बैठक होईल. मुलांना ही लस कशी आणि केव्हा वापरणे सुरु करायचे, याचा निर्णय घेईल.
युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये, ही लस १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मिळू शकते. या देशांमध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्यांना फायझरची लस दिली जात आहे. फायझरने असेही म्हटले आहे की, आता त्यांचे लक्ष ६ महिन्यांपासून ११ वर्षांपर्यंतच्या मुलांवर लसीची चाचणी घेण्यावर असेल.
फायझरची लस मुलांसाठी किती प्रभावी?
• फायझरचा असा दावा आहे की, त्यांनी १२ ते १५ वर्ष वयोगटातील २,२६० मुलांवर लसीच्या चाचण्या घेतल्या.
• ३१ मार्च २०२१ रोजी जाहीर झालेल्या निष्कर्षांनुसार या वयोगटात ही लस १००% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
• ज्यांना ही लस देण्यात आली त्यांच्यापैकी कोणालाही या विषाणूची लागण झाली नाही.
• चाचणीमध्ये १८ मुलांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु ते सर्व प्लेसिबो गटातील आहेत. प्लेसिबो म्हणजे ज्यांना चाचणीत समाविष्ट केले होते पण प्रत्यक्षात लस दिली नव्हती.
• लवकरात लवकर मुलांना शाळेत पाठविणे सुरु होईल, त्यावेळी मित्रांना भेटू शकतील. घराबाहेर खेळण्यासाठी मित्र आणि कुटूंबासह फिरू शकतील. त्यामुळे बचाव आवश्यक असेल.