मुक्तपीठ टीम
एका तरूणीमुळे आज पाच जणांचे प्राण वाचले आहेत. या ब्रेन डेड झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे की, मृत्यूनंतरही माणूस अमर होऊ शकतो. पुण्यातील लष्कराच्या सदर्न कमांड रुग्णालयात ब्रेन डेड तरूणीला आणण्यात आले. तिच्या जगण्याची आशा संपल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिची किडनी, यकृत आणि डोळे दान केले. यामुळे पाच जणांचे बहरले आहे. आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले आहे. अवयव दान केलेल्या ५ जणांपैकी दोन लष्करी जवान आहेत.
सदर्न कमांडच्या संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, या मुलीला दुर्दैवी घटनेनंतर रुग्णालयात आणण्यात आले होते. तिला रूग्णालयात भरती करताना तिच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. यावर तिच्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला की तिचे अवयव ज्यांना त्यांची नितांत गरज आहे त्यांना दान केले जातील.
यानंतर या तरुणीची किडनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या दोन जवानांवर, आर्मी मेडिकल कॉलेजच्या आय बँक सीएचमध्ये डोळे आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला यकृत प्रत्यारोपण करण्यात आले.