Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

संभाजी ब्रिगेड बदलतेय…समाजातून अर्थसत्ताधीश घडवण्यासाठी बिझनेस कॉन्फरन्स!

September 7, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
sambhaji brigade,

मुक्तपीठ टीम

संभाजी ब्रिगेडकडून आलेली ताजी बातमी ही संघर्षाची नसून समाजात व्यावसायिकता वाढवणारे ग्लोबल विझन तरुणाईच्या मनात रुजवणाऱ्या कार्यक्रमाची आहे. पुण्यात संभाजी ब्रिगेड आयोजित “नवी दिशा नवा विचार” बिझनेस कॉन्फरन्स नुकतीच संपन्न झाली.

 

संभाजी ब्रिगेड म्हटलं की संघर्ष. रस्त्यावरचा राडा. भावनात्मक मुद्द्यांवरची आक्रमकता. परंतु ती संघर्षशील संभाजी ब्रिगेड आता बदलतेय. संघर्षाचा स्वभाव कायम राखत, संघर्षाचं स्वरुप बदलताना दिसत आहे. त्यासाठी संघर्ष हा सकारात्मक काही तरी नवं घडवणारा असावा, असा प्रयत्न दिसत आहे. संभाजी ब्रिगेडकडून आलेली ताजी बातमी ही संघर्षाची नसून समाजात व्यावसायिकता वाढवणारे ग्लोबल विझन तरुणाईच्या मनात रुजवणाऱ्या कार्यक्रमाची आहे. पुण्यात संभाजी ब्रिगेड आयोजित “नवी दिशा नवा विचार” बिझनेस कॉन्फरन्स नुकतीच संपन्न झाली. त्यानिमित्तानं संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी खास मुक्तपीठसाठी मांडलेली या नव्या उपक्रमामागील सकारात्मक संकल्पना त्यांच्याच शब्दात:

 

प्रवीण गायकवाड

सर्वांना सस्नेह जय जिजाऊ !

मराठा ही खूप व्यापक आणि सर्वसमावेशक अशी ओळख आहे. महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठा म्हणून ओळखले जाते. भविष्यात ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेडची भविष्यातील वाटचाल व्हावी अशी माझी अपेक्षा आहे.

 

याआधीच्या काळात संभाजी ब्रिगेडने इतिहास, आरक्षण, इत्यादि विषयात आक्रमकपणे भूमिका घेतल्या. हजारो कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या. त्यातून काही बाहेर आले, तर काहीजण अजूनही कायदेशीर लढा देत आहेत. अनेक सहकारी आज आपल्यात नाहीत. अनेकांनी वेगळे मार्ग निवडले. या सगळ्यांच्या योगदानातून संभाजी ब्रिगेड नावारुपाला आली.

 

इथून पुढचा काळ हा प्रचंड संघर्षाचा आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे ही काळाची गरज बनली आहे. काळाची पावले ओळखून आपण मार्गक्रमण करायला हवे. त्यादृष्टीनेच ही बिझनेस कॉन्फरन्स आयोजित केली होती.

 

या बिझनेस कॉन्फरन्ससाठी बारामती ऍग्रोचे सीईओ आमदार रोहित पवार उद्घाटक म्हणून लाभले. युकेज रिसॉर्ट प्रा.लि. चे संतोष पाटील यांनी शाश्वत उद्योगाची पायाभरणी या विषयावर मार्गदर्शन केले. चिंतामणी मोटर्स प्रा.लि. चे उज्वल साठे यांनी Business & Business ही संकल्पना आपल्याला पटवून सांगितली. युवा उद्योजक अजयसिंह सावंत यांनी दुबई बिझनेस टूर आणि उद्योगभारतीचे संचालक महेश कडूस पाटील यांनी इस्राईल ऍग्रीकल्चरल टूर हे विषय घेऊन परदेशातील नोकरी, व्यवसाय व तंत्रज्ञान यातील संधींची ओळख करुन दिली. इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशनचे संस्थापक अभिजित शिंदे यांनी आयात निर्यात याबाबतच्या आपल्या मनातील अनेक शंकांचे निरसन केले. निवृत्त शासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी नॉलेज-स्किल-ऍटीट्युड या विषयाच्या अनुषंगाने प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. अभिनेते भरत जाधव, नागराज मंजुळे, अशोक समर्थ, निखिल चव्हाण यांनी सिने-कला क्षेत्रातील विविध संधी याबाबत सर्वांगीण बाबींची चर्चा केली.

 

एकंदर व्यवसाय विषयासंबंधी आपल्या मनात असणारी भीती, न्यूनगंड, अज्ञान आजच्या बिझनेस कॉन्फरन्सनंतर काही अंशी का होईना दूर होऊन आपण व्यवसाय क्षेत्रात उतराल अशी अपेक्षा आहे.

 

संभाजी ब्रिगेडची नवी दिशा आणि नवा विचार हा आर्थिक सक्षमीकरणावर भर देणारा राहील अशी मला खात्री आहे.

 

मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड आयोजित “नवी दिशा नवा विचार” या बिझनेस कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्रभरातून उपस्थित राहिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आजचा कार्यक्रम कसा वाटला याविषयी आपापल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त कराव्यात असे मी सर्वांना आवाहन करतो. सर्वांनी सुरक्षित प्रवास करा आणि सुखरुप घरी पोहोचल्यानंतर मेसेजद्वारे कळवा.

 

आपण असेच भेटत राहू. नव्या दिशेने नव्या विचाराने समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध राहू.

 

(प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बहुजन समाजाच्या हितासाठी अभ्यासपूर्ण मांडणी करण्याबरोबरच संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून रचनात्मक कार्यासाठीही ते ओळखले जातात.)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: NCPpravin gaikwadrohit pawarsambhaji brigadeप्रवीण गायकवाडबारामतीबिझनेस कॉन्फरन्सरोहित पवारसंभाजी ब्रिगेड
Previous Post

सोमवारी रुग्ण कमी! राज्यात फक्त ३ हजार ६२६ नवे रुग्ण!

Next Post

प्रेमासाठी राजकुमारीने त्यागलं राजघराणं, कोट्यवधीची नुकसानभरपाईही नको!

Next Post
princess Mako

प्रेमासाठी राजकुमारीने त्यागलं राजघराणं, कोट्यवधीची नुकसानभरपाईही नको!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!