मुक्तपीठ टीम
आशियातील सर्वात मोठ्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकर खात्याकडून चौकशी सुरु आहे. सध्या ही पतसंस्था त्यामुळे चर्चेत असली तरी प्रत्यक्षात या पतसंस्थेचं काम हे अनेक बँकांनाही मागे टाकणारे असल्याचे सांगितले जाते. या पतसंस्थेच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तेलंगणा, सीमांध्र, अंदमान व निकोबार ठिकाणी ४५३ शाखा आहेत. एकूण ठेवी ७,८७२ कोटी आणि एकूण कर्ज ५,७४३ कोटी रुपयांचे आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पावलं
- राधेश्याम चांडक यांनी १९८६ मध्ये बुलडाणा अर्बनची स्थापना केली.
- त्यानंतर बुलढाणा अर्बनने आपला कार्यविस्तार अनेक राज्यात केला आहे.
- विशेष म्हणजे बुलढाणा अर्बन कर्ज देताना कसल्याही दबावाला बळी पडत नाही.
- त्याचबरोबर कर्ज घेणाऱ्याची व्यवस्थित चौकशी करून कर्ज दिले जाते.
- राज्यातील शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी मदत व्हावी याकरिता बुलढाणा अर्बनने ३५५ गोदामे उभी केलेली आहेत.
- त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात शीतगृहाची उभारणी केली आहे.
- त्यामुळे अन्नधान्याची नासाडी होत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांचा मालाला योग्य दर मिळण्यास मदत होते.
ग्राहकांना अत्याधुनिक सेवा
- बुलढाणा अर्बनचे ढोबळ व निव्वळ एनपीए ३ टक्क्यापेक्षा कमी आहे.
- त्वरित कर्ज योजना, युटिलिटी पेमेंट, एसएमएस बँकिंग, इलेक्ट्रॉनिक व्हॅलेट, इझी पे कार्ड इत्यादी योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.
- विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना तीर्थयात्रेसाठी जाताना मदत व्हावी याकरिता तिरुपती, शिर्डी, कोल्हापूर, माहूर इत्यादी ठिकाणी भक्त निवास उपलब्ध केले आहे.
- लोकांना तिकीटाची व्यवस्था करून राहण्याची माफक दरात व्यवस्था केली जाते.
- याशिवाय बुलढाणा अर्बनने आणखी एक घेतलेला महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे सेंद्रिय उत्पादनाची उपलब्धता.
- पुण्यातील अष्टांग आयूर्वेद ईमारत, टिळक रोडवर पूर्ण जैविक स्टोअर उभारण्यात आले आहे.
बुलढाणा अर्बनचा पुढाकार
- बुलढाणा अर्बनचे काम अनेक राज्यांमध्ये चांगले चालू आहे.
- बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेशाम चांडक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बुलडाणा अर्बनची वाटचाल सुरु आहे.
- महाराष्ट्रातील जनतेला सहकाराच्या माध्यमातून मदत करण्यासाठी बुलडाणा अर्बनचे प्रयत्न सुरु असतात.
बुलडाणा अर्बनचे वेगळे काही उपक्रमही!
- बुलढाणा अर्बनने महिला सबलीकरणासाठी मायक्रोफायनान्स योजना सुरू केलेली आहे.
- याकरिता बुलडाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस नावाची वेगळी संस्था उभा करण्यात आली असून या संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी स्वप्नील वानखेडे आहेत.
- महाराष्ट्रभर ही संस्था महिलांना कौशल्य विकास , मायक्रोफायनान्स इत्यादी क्षेत्रांमध्ये मोलाची मदत करीत आहे.
पर्यावरण रक्षणासाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी छात्र निकेतन, पशुधन काळजी, रस्ते उभारणी या क्षेत्रातही बुलढाणा अर्बनचा पुढाकार असतो.
बुलढाणा अर्बनचे कार्यक्षेत्र वाढतेय…
- पश्चिम महाराष्ट्रातही बुलढाणा अर्बनने आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे.
- बुलढाणा अर्बनची पुण्यातील प्रभात रोड शाखा ३६५ दिवस कार्यरत असते.
- ऑनलाइन पेमेंट , रोबोटिक्स लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
- यामुळे बुलढाणा अर्बणला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
- बुलढाणा अर्बनच्या पुण्यामध्ये प्रभात रोड, पौड रोड, औंध, मार्केट यार्ड, शनिपार या ठिकाणी शाखा आहेत पिंपरी चिंचवड विभागांमध्ये चिंचवड, भोसरी, आळंदी, चाकण, शिक्रापूर , काळेवाडी, नवी सांगवी, चिखली येथे शाखा आहेत, साताऱ्यामध्ये सातारा, फलटण, बारामती, लोणंद, कोरेगाव, मसवड , मसूर , वाई , कराड दहिवडी , सातारा – महिला , उंब्रज येथे शाखा आहेत.
कोल्हापूर विभागामध्ये लक्ष्मीपुरी , कुरुंदवाड , महालक्ष्मी मंदिर , गडहिंग्लज, कसबा बावडा, आजरा इचलकरंजी, जयसिंगपूर, चंदगड, गारगोटी येथे शाखा आहेत. - बुलढाणा अर्बनच्या महाराष्ट्राबरोबरच गुजरात , राजस्थान , मध्यप्रदेश , छत्तीसगड , गोवा , तेलंगणा , सीमांध , अंदमान व निकोबार येथे शाखा आहेत.
- मुख्य कार्यालय बुलढाणा येथे आहे.
हे ही वाचा: बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकर झाडाझडती…अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचं कारण?