Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमटीएनएल, बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपन्यांचं चाललंय तरी काय?

December 12, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
BSNL And MTNL

मुक्तपीठ टीम

दूरसंचार पायाभूत सुविधांच्या विकासात आणि दूरसंचार सेवांच्या विस्तारामध्ये खाजगी दूरसंचार कंपन्यांसह बीएसएनल आणि एमटीएनएल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विशेषत: ग्रामीण आणि सेवा न पोहोचलेल्या दुर्गम भागात भारत सरकारच्या नागरिक केंद्रित योजनांच्या अंमलबजावणीसाठी बीएसएनएल आणि एमटीएनएल  महत्त्वाच्या सेवा आहेत. बीएसएनएलने  ३०.०९.२०२२ पर्यंत २४,५८,८२७ एफटीटीएच ( FTTH ) जोडण्या  प्रदान केल्या आहेत.

सरकारच्या आत्म-निर्भर उपक्रमाच्या अनुषंगाने, बीएसएनएलला भारतीय ४जी स्टॅक तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले. बीएसएनएलने  १ लाख 4G अधिष्ठानांच्या (साईट्स)  आवश्यकतेसाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये निविदा काढली आहे.

स्थापनेपासून ३१.०३.२०२२ पर्यंत  बीएसएनएलचा  एकूण निव्वळ तोटा ५७,६७१ कोटी रुपये आहे तर एमटीएनएलचा १४,९८९ कोटी रुपये आहे.

वर्षानुवर्षे  मोठ्या प्रमाणातील कर्मचारी खर्च, कर्जाचा बोजा, बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा आणि ४जी  सेवांचा अभाव (काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये मर्यादित आधार वगळता) ही बीएसएनएल  आणि एमटीएनएलच्या तोट्याची कारणे आहेत. २३.१०.२०१९ रोजी भारत सरकारने बीएसएनएल आणि एमएटीएनएलसाठी पुनरुज्जीवन योजना मंजूर केली. स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेद्वारे  (व्हीआरएस )   कर्मचार्‍यांच्या खर्चात कपात, सार्वभौम हमी रोखे वाढवून कर्जाची पुनर्रचना, भांडवली ओघाद्वारे  ४जी  सेवांसाठी स्पेक्ट्रमचे प्रशासकीय वाटप, मुख्य आणि मुख्य नसलेल्या  मालमत्तेचे मुद्रीकरण आणि बीएसएनएल आणि एमएटीएनएलच्या   विलीनीकरणाला तत्वतः मान्यता यांसारख्या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे.  याचा परिणाम म्हणून, बीएसएनएल आणि एमटीएनएलमध्ये  आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून इबीआयटीडीए बाबतीत (व्याज, कर, घसारा आणि कर्जमुक्ती)  सकारात्मक झाले आहेत.

बीएसएनएलला  व्यवहार्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात रूपांतरित करण्यासाठी, सरकारने २७.०७.२०२२ रोजी बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी  रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले. भारत ब्रॉडबँड निगम लिमिटेडचे  (बीबीएनएल ) बीएसएनएलमध्ये   विलीनीकरण करून बीएसएनल सेवेचे श्रेणीवर्धन  करणे, स्पेक्ट्रम वाटप करणे, ताळेबंदावरील भार  कमी करणे आणि फायबर नेटवर्क वाढवण्यासाठी  नवीन भांडवलाचा ओघ वाढवणे यावर पुनरुज्जीवन उपायोजनांमध्ये  लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या उपायांच्या अंमलबजावणीमुळे, बीएसएनएलला एक नवे वळण मिळून ती एक नफा कमावणारी संस्था बनणे अपेक्षित आहे.

दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


Tags: BSNLMTNLtelecom companyएमटीएनएलटेलिकॉम कंपनीबीएसएनएल
Previous Post

सोशल मीडिया अकाऊंट्सच्या अनिवार्य पडताळणीसाठी सरकारचे प्रयत्न

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेले विकासाच्या नभांगणातील ‘ते’ अकरा तारे कोणते?

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेले विकासाच्या नभांगणातील ‘ते’ अकरा तारे कोणते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेले विकासाच्या नभांगणातील 'ते' अकरा तारे कोणते?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!