मुक्तपीठ टीम
सांगलीच्या ९ वर्षाच्या चिमरुड्या धैर्या प्रशांत भाटे हिने ब्रायडल मेकअप करत सर्वानाच थक्क केले आहे. सांगली फेस्टिवलच्या लाईव्ह शोमध्ये धैर्याने अवघ्या २६ मिनिटात ब्रायडर मेकअप करीत विक्रम केला आहे. चिमुरड्या धैर्याच्या या अदाकारीचे सांगलीकर जनतेने भरभरून कौतुक केले आहे.
सांगलीमधील इंग्लिश शाळेत दुसरीला शिकणाऱ्या धैर्या हि एक उत्कृष्ठ मेकअप आर्टिस्ट म्हणून उदयाला आली आहे. तिच्या आईचे पार्लर आसल्याने अगदी लहानपणापासुन तिला घरातूनच मेकअपचे धडे मिळाले. आईसोबत कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असल्याने आईबरोबर ती पार्लरमध्ये जायची आणि यातूनच तिला मेकअप कसा करायचा याची माहिती मिळत गेली. आज सांगली फेस्टिवलमध्ये ९ वर्षाच्या चिमुरड्या धैर्याने सर्वांसमोर अवघ्या २६ मिनिटात एका महिलेचा ब्रायडर मेकअप पूर्ण करत सर्वानाच थक्क केले. ब्रायडर म्हणजेच नववधूचा मेकअप असतो मात्र इतका अवघड मेकअप धैर्या 26 मिनिटात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
बाईट: अस्मिता भाटे, धैर्याची आई
या ब्रायडर मेकअप बाबत चिमरुड्या धैर्याने सुद्धा मनसोक्तपने माहिती देत मोठे होऊन मेकअप आर्टिस्ट बनायचं असल्याचे धैर्याने सांगितले.
बाईट: धैर्या: ९ वर्षीय मेकअप आर्टिस्ट
तर ज्या महिलेचा तिने ब्रायडर मेकअप केला त्या महिलेला सुद्धा सुरवातीला दडपण आले होते मात्र धैर्याने मेकअप आर्टिस्टचे सर्व पैलू आत्मसात केल्याने त्या महिलेने सुद्धा प्रतिसाद दिलक
बाईट: प्रियदर्शिनी यमगर,
सांगलीच्या धैर्याने ९ वर्षाच्या वयात जे धाडस दाखवले याचे सर्वत्र कौतुक होत आहेच मात्र हजारो लोकांसमोर अवघ्या २६ मिनिटात ब्रायडर मेकअप करत तिने केलेला प्रयोग या देशाला एक बाल मेकअप आर्टिस्ट मिळवून देणारा ठरणार आहे