मुक्तपीठ टीम
आजच्या युगात मेंदूशी संबंधित समस्या खूप वाढल्या आहेत. सर्व वयोगटातील लोक या समस्यांना बळी पडत आहेत. मेंदूशी संबंधित सर्वात मोठा धोका म्हणजे ब्रेन स्ट्रोक आहे. ब्रेन स्ट्रोक हे सहसा वृद्धांमध्ये अधिक दिसून येते, परंतु आजकाल तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. स्ट्रोक ही अशी स्थिती आहे जेव्हा मेंदूतील रक्त संचारण किंवा रक्तपेशींमध्ये अडथळे येतात.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेन स्ट्रोकचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे इस्केमिक आणि दुसरा म्हणजे हेमोरेजिक आहे. ब्रेन स्ट्रोकची प्रमुख कारणे म्हणजे वृद्धापकाळात रक्तपेशींचे आकुंचन, रक्तदाब वाढणे, धमनी रोग, लठ्ठपणा, कोलेस्टरॉल वाढणे, धूम्रपान आणि त्यावर ताबडतोब उपचार न केल्यास शरीराच्या अर्ध्या भागाला अर्धांगवायू होतो.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे कोणती?
- स्ट्रोकनंतर हात-पाय सुन्न होतात
- गोंधळ होतो
- भाषा समजण्यास अडचण येते
- बोलण्यात अडचण येणे
- तोल जाणे
- उलट्या होणे
- चक्कर येणे ही लक्षणे दिसतात.
ब्रेन स्ट्रोकमध्ये कोणता आहार घ्यावा?
- ब्रेन स्ट्रोक झाल्यास योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
- फळे आणि भाज्यांचे सेवन वाढवावे.
- आहारात बीन्स, मल्टिग्रेन लीन प्रोटीन, बाजरी, बदाम, अक्रोड, कमी चरबीयुक्त दूध, फ्लेक्ससीड, सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया, स्ट्रॉबेरी बेरी, सफरचंद, पपई, गडद हिरव्या भाज्या, भाजलेले आले, लसूण, कच्ची हळद, दालचिनी यांचे जास्त सेवन करावे.
- यासोबतच सॅच्युरेटेड फॅट, प्रोसेस्ड फूड पिझ्झा, केक, पेस्ट्री, क्रीम, रेड मीट, जास्त मीठ, साखर आणि मैदा असलेले अन्न सोडून द्यावे.