मुक्तपीठ टीम
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी व महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध दिवाळी फराळ व खाऊ वाटप करण्यात आले.
ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र प्रदेशतर्फे मंत्र जागर करून सीमाताई आणि रामदास आठवले यांचे दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना करण्यात आली. ५० पुरोहित बंधुना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. कोथरुड येथील अंध शाळेत मुलींच्या हस्ते केक कापून, त्यांच्यासाठी स्नेहभोजन व्यवस्था करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या मुलींना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
पुणे बार असोसिएशन सदस्या ॲड अर्चिता मंदारभाऊ जोशी यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम झाला. माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, मोनिकाताई मोहोळ, अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष आनंद दवे, ‘आरपीआय’चे ॲड मंदारभाऊ जोशी, महासंघाचे श्वेता कुलकर्णी, विद्या घटवाई, हर्षद ठकार, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री थत्ते, ‘आरपीआय’चे जितेश दामोदरे, वसंत बनसोडे, शिवाजी कांबळे, केजी पवळे, अशोक करंजकर, रेखाताई चव्हाण, वसंत ओव्हाळ यांचेसह प्रमुख पुरुष व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
(बातमीसोबत वापरलेले मुख्य छायाचित्र त्या कार्यक्रमातील नाही, इतर दोन छायाचित्र कार्यक्रमातील आहेत.)