Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्राह्मणांनाही पाहिजे महाराष्ट्रात अॅट्रोसिटीचे संरक्षण आणि शिक्षण-नोकरीत आरक्षण!

ब्राम्हण समाजाचे औरंगाबादेत आंदोलन

January 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
Brahman Agitation-3

मुक्तपीठ टीम

ब्राम्हण समाजाला शैक्षणिक आणि रोजगार क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी ‘समस्त ब्राम्हण समाज संघर्ष समिती’ने शुक्रवारी औरंगाबादेत आंदोलन केले. ताम्हण-पळी बजाव आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकांनी ब्राह्मणांना जातीयदृष्ट्या हिणवले जात असल्याने अॅट्रोसिटी कायद्यासारखे संरक्षणही मिळावे, अशीही मागणी केली.

Brahman Agitation-1

आमच्यावर ताम्हण-पळी वाजवण्याची वेळ सरकारने आणली आहे. इतरांना काही न मागता मिळतं. आम्ही मागूनही मिळत नाही. संघर्ष केल्याशिवाय आम्हाला काहीच मिळत नाही. सर्वांना सर्व मिळाले. ब्राह्मणांना मात्र शुन्यावरच ठेवले आहे. मात्र, जोपर्यंत ब्राह्मण कुणाला साथ देत नाही तोपर्यंत कुणालाच किंमत नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट शब्दात बजावले.

 

ब्राह्मण समाजाच्या मागण्या

  1. ब्राह्मण समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्यावे

  2. ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, एक हजार कोटींची तरतुद करावी

  3. ब्राह्मण समाजाला हिणवणाऱ्यांवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी

  4. ब्राह्मण समाजाच्या मुलींबद्दल समाजमाध्यमात गैरउद्गार काढणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी

  5. ब्राह्मण समाजासाठी वसतीगृह स्थापन करावे

  6. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा

  7. पुरोहितांना मासिक पाच हजार मानधन द्यावे

  8. केजी ते पीजी मोफत शिक्षण द्यावे

  9. ब्राह्मण समाजाचे आर्थक सर्वेक्षण व्हावे

  10. ब्राह्मण समाजाच्या कुळ कायद्यात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात

 

आंदोलनादरम्यान समितीच्या महिला सदस्यांनी देखील त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.

समिती सदस्य विजया कुलकर्णी म्हणाल्या की, “ ब्राह्मण समाजासोबत नेहमीच भेदभाव होतो. भारतात मुलांना संधी मिळत नसल्यामुळे आमच्या मुलांना परदेशात जाण्यास भाग पडत आहेत. त्यांच्या कौशल्याचा फायदा घेत इतर देश पुढे जात आहेत आणि आपला देश मागे राहिला आहे. सगळ्या भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ब्राह्मण एक होत आहेत. १०० टक्के रिझल्ट देणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य कराव्यात.”

जयश्री चौबे म्हणाल्या की,“ब्राह्मण समाजाने पायाभूत सुविधांसाठी इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला असे कधी झाले नाही, परंतु तरीही ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही इतरांसारखे नाही जे त्यांच्या मागण्यांसाठी दबाव आणतात मालमत्तेचे नुकसान करतात. आम्ही कुठलाही उपद्रव करत नाहीत. सर्व समाजांना सर्व मिळतं. आता सर्व करतात तसंच ब्राह्मणही एकत्र येऊन आपला आवाज उठवू शकतो. इतरांसारखा उपद्रव करत नाही. संपत्तीचा नाश करत नाही.”

Brahman Agitation-2

उज्वला पैठणे म्हणाल्या, “आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षण हवे आहे, जेणेकरून कोणत्याही क्षेत्रात आम्ही मागे राहाणार नाही. नोकरी-शिक्षणात आरक्षण मिळावे. आमच्या मुलींची बदनामी होऊ नये. जे जातीनुसार शेंडी, पळी असे हिणवतात त्यांच्यावर अॅट्रोसिटीची कारवाई व्हावी.”

 

आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची औरंगाबादमधील राजकीय नेत्यांनी भेट घेतली. त्यात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे अतुल सावे यांचा समावेश होता.

 

कमेंटमध्ये आपलं मत नक्की मांडा. 

#व्हाअभिव्यक्त या कॅटेगरीत आपण आपले मत जे असेल ते सरळस्पष्ट मांडू शकता. अट एकच कोणाच्या भावना दुखावणारे नसावे. मेल करा muktpeethteam@gmail.com व्हॉट्सअॅप, टेलीग्राम करा 701148070


Tags: brahmanbrahman reservationब्राह्मण आरक्षणब्राह्मण समाज
Previous Post

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

“युती सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाचा रथ थांबला”

Next Post
ashok chavan

"युती सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाचा रथ थांबला"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!