रोहिणी ठोंबरे/ मुक्तपीठ टीम
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच संघाच्या कार्यालयावर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. कुन्नूर येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आरएसएस कार्यकर्त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळमध्ये घडलेली राजकीय हिंसाचाराची ही पहिली घटना नाही, याआधीही संघाच्या, भाजपाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते, नेते यांना लक्ष्य केलं गेलं आहे. तर विरोधातील डाव्या विचारांच्या नेत्या-कार्यकर्त्यांवरही हल्ले झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि केरळमधीव वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयावरील हल्लाही केरळमधील राजकीय हिंसाचाराचाच भाग होता. त्यामुळे संघ कार्यालयावरील हल्ल्याच्या निमित्तानं केरळमधील राजकारणाच्या रक्तचरित्रमचा वेध घेऊया…
केरळमधील संघ कार्यालयावर बॉम्ब हल्ल्याची घटना
केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पय्यान्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आला आहे.
पय्यान्नूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी घडली, हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
केरळमध्ये नवा नाही राजकीय हिंसाचार
- केरळमध्ये गेल्या काही वर्षांत २६०हून अधिक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
- केरळमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक संघ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.
- प्रत्युत्तरादाखल, द सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच SDPI कार्यकर्त्यांनाही उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी लक्ष्य केले आहे.
- केरळचे भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांची अलप्पुझा येथे हत्या करण्यात आली होती.
- त्यानंतर १० तासात एसडीपीआयचे केरळ राज्य सचिव केएस शान यांची अलप्पुझा येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.
भाजपाकडून केरळमधील डाव्या सरकारवर हल्लाबोल
- या घटनेवर भाष्य करताना भाजपचे टॉम वडक्कन यांनी लिहिले की, सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकण्याइतपत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे, हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे.
- नागरी समाजात हे मान्य नाही.
- यापूर्वीही संघ कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. यासाठी पोलीस आणि राज्य प्रशासन जबाबदार आहे.
- पोलिसांचे अशांशी संगनमत अत्यंत धोकादायक आहे.
- पोलीस ठाणे १०० मीटर अंतरावर असूनही काहीही होत नसल्याची उदाहरणे आहेत.
डाव्या नेत्यांचा भाजपावर आरोप
- एकीकडे राजकीय हिंसाचार जोरात असतानाच दुसरीकडे समाजमाध्यमांमध्येही संघर्ष सुरु आहे.
- राजकीय नेत्यांमधील ट्विटर युद्धामुळेही तणाव अधिकच वाढत आहे.
- एसडीपीआयचे प्रमुख एम.के. फैजी यांनी ट्विट केले की, ‘राज्यात जातीय हिंसाचार घडवून जातीय सलोखा बिघडवणे हा संघ परिवाराच्या अजेंड्याचा भाग आहे.
- संघाच्या दहशतवादाचा निषेध.
राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला
- केरळमधील वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेवर निवडून गेले आहेत.
- त्यांच्या स्थानिक कार्यालयावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला. हल्ल्यादरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) विद्यार्थी संघटना एसएफआयच्या निषेध मोर्चातील एका गटाने राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली.
- राहुल गांधींनी त्या हल्लेखोर तरुणांना क्षमा करण्याची घोषणा करताच तो व्हिडीओ राजस्थानमधील उदयपूरच्या घटनेशी चुकीच्या पद्धतीने जोडून भाजपाचे काही नेते, काही न्यूज चॅनल्सनी खोडसाळ बातम्या चालवल्या.