मुक्तपीठ टीम
बॉलिवूड हे नाव ऐकताच फक्त भारतातच नाही तर, जगभरात बॉलीवूडचे अनेक चाहते आहेत. शाहरूख, सलमानपासून ते अशा अनेक दिग्गज कलाकारांसाठी लोक वेडे आहेत. त्यांनापाहूनच लोक स्वत:मध्येही बदल करतात. जगातील बहुतेक ठिकाणी बॉलीवूड चित्रपट पाहिले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की तुमचा आवडता अभिनेता प्रत्येक चित्रपटासाठी किती पैसे घेतो? या सर्व बॉलिवूड कलाकारांची एकूण संपत्ती किती आहे? बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकार असणाऱ्यांची यादीही बनवली जाते. जाणून घ्या या यादीत कोणते कलाकार आहेत.
बॉलिवूड २०२२मधील टॉप ५ सर्वात श्रीमंत कलाकार!
१. शाहरुख खान
शाहरुख खानचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखकडे ५१०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य करणारा SRK म्हणून ओळखला जाणारा शाहरुख बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. शाहरुख प्रत्येक चित्रपटासाठी ४०-५० कोटी रुपये घेतो. किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखला जाणारा शाहरुख चित्रपटांमधून कमाई करतो. शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स देखील आहे.
२. अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपट जगताचे सम्राट मानले जाते. अमिताभ बच्चन हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे सुमारे २९५० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
३. सलमान खान
दबंग खान म्हणून ओळख असलेला सलमान खान बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सलमान खान एका चित्रपटासाठी ६० कोटी रुपये घेतो. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करतात. त्याने चित्रपटसृष्टीत ३४ वर्षे पूर्ण केली आहेत.
४. अक्षय कुमार
बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता अक्षय कुमार श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अक्षय कुमार प्रत्येक चित्रपटासाठी ५० कोटी घेतो. षय कुमारने अनेक देशभक्तीपर आणि सामाजिक चित्रपट केले आहेत. अक्षय कुमारकडे २ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
५. आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची संपत्ती १५६२ कोटी रुपयांची आहे. अलीकडेच त्याने सांगितले की तो एक-दोन वर्षांसाठी चित्रपटांमधून ब्रेक घेत आहे. आमिर खान एका चित्रपटासाठी ३५ कोटी घेतो. तो त्याच्या प्रॉडक्शनमधून पैसे कमवतो. अमीर खान ऑनलाइन पेमेंट कंपनी फोनपेचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.