मुक्तपीठ टीम
मुंबई सायबर सेलनं एका मोठ्या सेक्स्टॉर्शन टोळीला अटक केली आहे. या टोळीने सामान्यांपासून आतापर्यंत शंभराहून अधिक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य केलं आहे. सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, आरोपी प्रथम विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मैत्री करतात आणि नंतर विश्वास जिंकला की त्यांच्यासोबत न्यूड व्हिडिओ कॉल करायचे.
कळस म्हणजे आरोपी पैसे उकळत असतानाच या सेलिब्रिटींचे न्यूड व्हिडीओ डार्क वेबवर विकण्यातही आले आहेत. मुंबई पोलिसांनी सेक्स्टॉर्शनच्या आजवरच्या सर्वात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. देशातील विविध राज्यांतून पोलिसांनी टोळीच्या ५ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे.
आतापर्यंत २५८ लोकांना लक्ष्य
- हे आरोपी अतिशय सुशिक्षित असून यातील दोन आरोपी इंजिनिअर आणि दोन विज्ञान पदवीधर आहेत तर एक अल्पवयीन आहे.
- पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन, १२ बनावट खात्याचा तपशील,
- ६ बनावट ईमेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
- आतापर्यंत या आरोपींनी सुमारे २५८ लोकांना लक्ष्य केले होते.
- ज्यात बॉलिवूडशी संबंधित मोठ्या संख्येने आहेत.
- याशिवाय टीव्ही सेलिब्रिटीही या सेक्स्टॉर्शन रॅकेटचे बळी ठरले आहेत.
नेपाळच्या बँकेत खातं
- खंडणीची रक्कम नेपाळमधील एका बँक खात्यात जमा होत होती.
- देशात पैशाच्या व्यवहाराचा कोणताही पुरावा नाही आणि पकडल्यास त्यांचे खाते त्वरित फ्रिज करता येणार नाही.
- मात्र, आरोपींच्या अटकेनंतर सायबर सेलने नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली असून बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे जेणेकरून प्रकरणाच्या तळाशी जाती येईल.