मुक्तपीठ टीम
आजच्या काळात, जिथे सोशल मीडिया लोकांसाठी खूप महत्वाचा आहे आणि लोकांना जगाशी अपडेट ठेवत आहे. त्याचबरोबर यामुळे त्रासही होत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप विशेषतः महिलांसाठी घातक ठरत आहे. सोशल मीडियावर महिलांचे दररोज शोषण केले जात आहे. अधूनमधून त्यांचा गैरवापर होतो. अशीच एक घटना समोर अली आहे.
सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्रीचा छळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका यूट्यूबरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने तक्रार दाखल केली होती, तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
- यूट्यूबरने तिच्या सन्मानाला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांच्या दृश्यांसह हॅशटॅग चालवले होते. तिच्याविरुद्ध काही चुकीचे संदेश पसरवले गेले.
- गुन्हेगारावर आयपीसी कलाम ३५४ डी (पाठपुरावा), ५०९ (स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्द, हावभाव किंवा कृती), आयटी कायद्याचा कलाम ६७ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई) दाखल करण्यात आला आहे