मुक्तपीठ टीम
मुंबई महापालिकेने एकूण १ लाख २५ हजार रुपयांची बक्षिसे देऊन मुंबईकरांच्या सेवेकरीता स्वत:चा जीव धोक्यात घालणा-या मुंबई पालिकेच्या डॉक्टरांचे कौतूक केले आहे. केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांतील तब्बल २ हजार १५५ डॉक्टरांना दोन टप्प्यांत हा लाभ मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी, १८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत दोन समान हफ्त्यात ही रक्कम दिली जाणार आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देताना आतापर्यंत ५०० डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र या सर्व डॉक्टरांनीच कोरोनाला पिटाळून यशस्वीरीत्या पुन्हा ड्युटी सुरू केली आहे.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यात रुजू झाली. त्यावेळी रुग्णांशी थेट संपर्क येणा-या डॉक्टरांचे काम सर्वाधिक आव्हानात्मक होते. त्यावेळी या सर्व डॉक्टरांनी दिवसभर कोरोना कीट घालून कोविड रुग्णांवर उपचार केले. २४ मार्च २० पासून देशभरात लॉकडाऊन लागू झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्यातील शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी केलेल्या सेवेचे ऋणनिर्देश मानण्यासाठी ही प्रतिकात्मक रक्कम दिली जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकूण डॉक्टरांची संख्या : केईएम रुग्णालय झ्र १०५५., शीव रुग्णालय ६०४., नायर रुग्णालय झ्र ४९१., कूपर रुग्णालय ५ .. : एकूण २ हजार १५५ डॉक्टर्स.