मुक्तपीठ टीम
मुंबई महानगरपालिकेने काही कोटी खर्च करून निरनिराळ्या कंपन्यांच्या बायोमॅट्रिक हजेरी मशिन आणल्या. परंतु मशिन सतत बंड पडत असल्यामुळे, कामगारांनी काम करून सुध्दा काही दिवसाचे पगार कापले जात आहेत. अनेक कामगारांचे २०-२५ हजार रुपये कापले गेले असून ऐन गणपती सणाच्यावेळी हजारो कामगारांचे पगार हे शून्य (0) आलेले आहेत. पगार काहीच हातात आला नसल्यामुळे कामगारांच्या मनामध्ये फारच असंतोष पसरला आहे.
गणपतीचा सण लक्षात घेऊन कामगारांना पूर्ण पगार द्यावा म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष अशोक जाधव आणि सहा सरचिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) शर्मा यांची भेट घेतली आणि ANM झालेल्या कामगारांचे पूर्ण पगार त्यांच्या खात्यात जमा करावे अशी विनंती केली.
महानगरपालिकेच्या निरनिराळ्या खात्यामध्ये दर दिवसाची हजेरी घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपण्यांच्या बायोमॅट्रीक हजेरी मशिन घेतल्या गेल्या. २० कामगारांच्या मागे १ मशिन देण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले होते. तसे आदेशही काढले होते. परंतू आजच्या घडीला काही हजेरी ठिकाणावर (चौकीवर) ७०-८० कामगारांसाठी फक्त १ मशिन उपलब्ध आहे ती पण मशिन बंद पडली तर कामगारांना दूरवर असलेल्या मशिनकडे पळावे लागत आहे. बायोमॅट्रीक मशिनवार अंगठा देण्यासाठी कामगार गेला तर हमखास नेट उपलब्ध होत नाही. कधि ईरर कधि लाईट नसणे यामुळे ३ वर्षांमध्ये जवळपास २५ लाख ANM झाले आहेत. याचाच अर्थ कामगारांनी काम करून सुध्दा त्यांचे खाडे झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगारांचे २०-२५ हजार रुपये कापले गेले असून ऐन गणपती सणाच्यावेळी हजारो कामगारांचे पगार हे शून्य (0) आलेले आहेत. पगार काहीच हातात आला नसल्यामुळे कामगारांच्या मनामध्ये फारच असंतोष पसरला असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी माहिती दिली आहे..
गणपती सण लक्षात घेऊन कामगारांना पूर्ण पगार द्यावा म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष अशोक जाधव आणि सहा सरचिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) शर्मा साहेब यांची भेट घेतली आणि ANM झालेल्या कामगारांचे पूर्ण पगार त्यांच्या खात्यात जमा करावे अशी विनंती केली. शर्मा यांनी विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार मानले असल्याची माहिती कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
जर का काम करून सदोष बायोमॅट्रीक मशिनमुळे कामगारांचे खाडे होत असतील, कामगारांचे हजारो रुपये कापले जात असतील तर अशा मशिनवर हजेरी लावण्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणेच हजेरी मस्टरवर हजेरी घेण्यात यावी अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. जर का बायोमॅट्रीक मशिनवर कामगार अधिकारी यांची हजेली लावलीच पाहिजे हा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा हट्ट असेल तर राज्य सरकारप्रमाणे किमान पगाराशी तरी बायोमॅट्रीक हजेरी जोडू नये, अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर आणि कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.