मुक्तपीठ टीम
काळ्या तांदळाच्या लागवडीबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण आता काळ्या गव्हाची लागवडही होऊ लागली आहे. हळूहळू या लागवडीला उत्तर भारतातील काही ठिकाणी वेग आला आहे. बिहारमधील नौबतपूर येथील सोना गावात प्रथमच काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली आहे. पूर्वी काळ्या गव्हाबद्दलची माहिती पटनामधील फक्त काही शेतकर्यांनाच होती, परंतु आता त्याची गुणवत्ता व नफा पसरू लागल्याने इतरही शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाचे पीक घेणे सुरु केले आहे. सामान्य गव्हाप्रमाणेच काळा गहू तयार होतो. या गव्हाचे उत्पादन जास्त होते. तसेच ते प्रति क्विंटल १५ ते १६ हजार रुपये दराने विकले जाते.
काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा चांगला असतो. काळा गहू आरोग्यासाठी चांगला आहे. एवढेच नव्हे तर, शेतकर्यांसाठी तो खूप फायदेशीर ठरत आहे. बाजारात प्रति क्विंटल १५ ते १६ हजार रुपये दराने विक्री केली जाते. हा दर सामान्य गव्हाच्या तुलनेत जास्त आहे. या गव्हाच्या लागवडीतून सर्वसाधारण गव्हापेक्षा जास्त नफा मिळवता येईल. काळा गहू खाण्यात स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त हे अनेक गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांना हा गहू खूप फायदेशीर मानला जात आहे.
शेतकऱ्यांना काळा गहू भावतो आहे. काळ्या गव्हाची गव्हाची पेरणी आठ ते दहा किलो प्रती गुंठा आहे. गव्हाचे उत्पादन हेक्टरी १५ ते २० क्विंटल आहे. त्यात वर्मी कंपोस्ट व डब्ल्यूडीसी खत वापरले गेले आहे. गव्हाचे हे वाण राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्था, मोहाली, पंजाब यांनी विकसित केले आहे. आता काही शेतकरी काळ्या गव्हाप्रमाणेच काळ्या तांदळाचीही लागवड करतात.
बर्याच वेळा लोक कर्करोगासारख्या आजाराचे बळी ठरतात. जर त्यांनी हा गहू वापरला तर ते या आजारांपासून वाचू शकतील, असे सांगितले जाते. सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हात अँथोसायनिनचे प्रमाण जास्त असते. सामान्य गव्हामध्ये पिगमेंटचे प्रमाण ५ ते १५ पीपीएम असते, तर काळ्या गव्हात पिगमेंटचे प्रमाण ४० ते १४० पीपीएम असते. अँथोसायनिन अँटीऑक्सिडेंट म्हणून शरीरात कार्य करते.
पाहा व्हिडीओ: