Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाकरे सरकारच्या सूडबुद्धीने नारायण राणेंची तब्येत बिघडली! अनिल परबांच्या विरोधात न्यायालयात जाणार!

भाजपा अनिल परबांविरोधात टीव्ही 9वरील व्हिडीओ क्लिप पुरावा म्हणून वापरणार

August 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP-anil parab

मुक्तपीठ टीम

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्यामुळे सत्याचा विजय झाला आहे. ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अमानुष वागणूक दिल्यामुळे नारायण राणे यांची तब्येत बिघडली. पण ते बरे झाल्यानंतर त्यांची कोकणातील जन आशिर्वाद यात्रा लवकरच पुन्हा सुरू होईल, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की, राणे यांना अटक करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी कशी दादागिरी केली आणि बळाचा वापर करण्यास सांगितले हे काल टीव्ही9 या चॅनलने दाखविले आहे. भाजपा ती क्लिप पुरावा म्हणून सादर करत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.

अनिल परबांची टीव्ही9ने दाखवलेली क्लिप भाजपा वापरणार

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे थेट पोलिसांशी बोलत असल्याची क्लिप टीव्ही9 या चॅनलने दाखवली आहे. भाजपने त्याचा आधार घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • परब यांच्याविरोधात ती क्लिप पुरावा म्हणून सादर करत न्यायालयात जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
  • भाजपा अनिल परब यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार आहे.
  • भाजपाकडून परबांविरोधातील याचिकेचे ड्राफ्टिंग केलं गेलं आहे.
    किती कायदा हातात घेणं चाललं आहे? किती अरेरावी चालली आहे?
  • पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललं आहे. यांच्यात सरकार चालवण्याची हिंमत नाही. ती क्लिप घेऊन आम्ही कोर्टात जाणार आहोत.
  • हे असं दबाव आणणं कशात बसतं, हे न्यायालयात विचारणार आहोत, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

आघाडी सरकारकडून राणेंना अमानुष वागणूक

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी महाविकास आघाडी सरकारकडून अत्यंत अमानुष व्यवहार झाला. त्यांना पोलिसांनी अटक केली त्यावेळी ते जेवत असताना हातातले ताट काढून घेतले गेले. त्यांना अडीच तास संगमेश्वर पोलीस स्थानकात बसवून ठेवले. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना उपचार देण्याची गरज आहे, असे डॉक्टरांनी अटक करताना सांगूनही वैद्यकीय उपचार दिले नाहीत. यामुळे राणेसाहेबांची तब्येत बिघडली. तथापि, विश्रांती घेतल्यानंतर राणेसाहेबांची तब्येत सुधारली की लवकरच त्यांची जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल.

राणेंना घाबरून सिंधुदुर्गात संचारबंदी

त्यांनी सांगितले की, राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला मुंबई आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घाबरलेल्या ठाकरे सरकारने त्यांना अटक केली. आता सरकारने घाबरून सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल रात्री बारापासून सात दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. पण त्याने भाजपाला फरक पडत नाही. राणेसाहेबांची तब्येत बरी झाली की पुन्हा यात्रा सुरू होईल.

राजकीय सूडबुद्धीचा खेळ

ते म्हणाले की, राज्यात काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा पूर्णपणे सूडबुद्धीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही आणि न्यायालयाने नारायण राणे यांची जामीनावर मुक्तता केली. सत्याचा विजय झाला. गेली वीस महिने आघाडी सरकारने एखादा कार्यकर्ता किंवा संस्था यांना अडकविण्यासाठी केलेला एकही प्रयत्न न्यायालयात टिकला नाही आणि सरकारला न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या. तसेच आताही झाले आहे.

 

त्यांनी सांगितले की, राणे यांना अटक करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी कशी दादागिरी केली आणि बळाचा वापर करण्यास सांगितले हे काल दूरचित्रवाणी वाहिनीने दाखविले आहे. भाजपा अनिल परब यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.


Tags: Anil ParabBJPchanrakant patilShivsenaअनिल परबचंद्रकांत पाटील
Previous Post

“कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मिशन वात्सल्य”: ॲड यशोमती ठाकूर

Next Post

केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणेंना कशी झाली सामान्य आरोपीसारखी अटक? समजून घ्या नियम…

Next Post
rane & parliment

केंद्रीय मंत्री असूनही नारायण राणेंना कशी झाली सामान्य आरोपीसारखी अटक? समजून घ्या नियम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!