मुक्तपीठ टीम
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भरत भालके यांच्यापेक्षा ३७३३ मते जास्त मिळवत विजय मिळवला आहे. अटीतटीच्या लढतीत दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार झाला होता. पंढरपूर-मंगळवेढ्याचे मतदार भाजपालाच पावले आहेत.
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपात अटीतटीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेली पोटनिवडणुक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. भाजपासह राष्ट्रवादीनेही ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.
पंढरपुरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळाला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून २ लाख ३४ हजार मतदारांनी एकूण ५२४ मतदान केंद्रावर मतदान केले होते.
- भाजप – समाधान आवताडे – 109450 विजयी
- राष्ट्रवादी – भगीरथ भालके – 105717 पराभूत
कशी रंगली लढत?
१. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावाच्या पाण्याचा प्रश्न या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला.
२. मंगळवेढा भागात याचा प्रभाव मतमोजणीत दिसून आला होता.
३. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे यांच्यामुळे राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्या अडचणी वाढल्या होत्या.
४. भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडेंची बंडखोरी त्यांच्यासाठी घरचंच दुखणं ठरली होती.
५. मात्र, आधी आश्वासन देऊन नंतर वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई आघा्डीला पराभवाचा झटका देणारी ठरल्याचे मानले जात आहे.