Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेत इनकमिंग, भाजपात आउटगोईंग

January 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
udhav thakyre

शिवसेना आज भाजपला मोठा धक्का देणार आहे. सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकचे दोन मोठे नेते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वसंत गिते आणि सुनील बागुल या नेत्यांनी काल शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तसेच आज पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी ६ वाजता वर्षा बंगल्यावर गिते आणि बागुल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार आहेत.

 

वसंत गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते. मात्र, सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी या नेत्यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

 

गिते आणि बागूल यांच्याकडे मागील कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्षपद होते. परंतु, नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरून हटवण्यात येऊन पक्षात आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे राजकीय वजन वाढविण्यात आले. त्यामुळे ते नाराज होते. अलीकडेच गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना ‘मिसळ पार्टी’ देऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तेव्हाच ते वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

 

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तीन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या नियोजित दौऱ्यापूर्वी शिवसेना आज भाजपला धक्का देणार आहेत. या दोन्ही नेत्याच्या पक्षांतरानंतर नाशिकमधील स्थानिक राजकीय समीकरणात बदल होणार असून भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.


Tags: BJPnashikShivsenaनाशिकभाजपविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसशिवसेना
Previous Post

राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

पासिंग द पार्सल- पत्राचाळीचा डर्टी गेम

Next Post
Patra chawl -1

पासिंग द पार्सल- पत्राचाळीचा डर्टी गेम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!