मुक्तपीठ टीम
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाब वगळता चांगलं यश मिळवत असलेल्या भाजपानं जल्लोष करतानाच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा खरमरीत टोला मारला आहे. या दोन पक्षांची स्पर्धा नोटा म्हणजे कुणीही उमेदवार पसंत नाही अशा मतांच्या संख्येशी असल्याचा खोचक ट्वीट महाराष्ट्र भाजपाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आकडेवारीनुसार या दोन मराठी पक्षांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेपेक्षा तुटपुंज्या मतांच्या स्पर्धेत पुढे असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
भाजपाचं खोचक ट्वीट
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पर्धा ही ‘नोटा’च्या मतांसोबत असणार हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं.
- महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आले आहे.
- त्या ट्वीटमध्ये गोव्यात नोटाला मिळालेली एकूण मते दिली आहेत.
- नोटा १.१३ % ( ६ हजार ४३९ मते)
- राष्ट्रवादी काँग्रेस १.०९% (५ हजार ०५८ मते)
- शिवसेना ०.१८ % (१ हजार ०९९ मते)
- दोन्ही पक्षांची मिळून ६ हजार १५७ मते आहेत.
- त्यामुळे या दोन्ही पक्षांची स्पर्धा ही नोटासोबत असल्याचं भाजपाने ट्विटमध्ये मांडले आहे.
- नोटापेक्षाही कमी मते मिळवणाऱ्या या दोन्ही पक्षांचे नेते २०२४ रोजी पंतप्रधान होतील, असाही टोला भाजपने लगावला आहे.
या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटा सोबत असणार हे @Dev_Fadnavis जी यांनी आधीच सांगितलं होतं.
नोटा : 6439 मते (1.1%)
राष्ट्रवादी काँग्रेस : 5058
शिवसेना : 1099 (0.2%)
दोन्ही मिळून : 6157 (1%)हर्बल इफेक्ट नुसार दोन्ही पक्षांचे नेते, 2024 ला पंतप्रधान होतील.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 10, 2022
दूरच्या आपला २ जागा!
एकीकडे दिल्लीतील अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी दूरच्या गोव्यात २ जागा मिळवत असताना शेजारच्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही. त्यामुळे उलट शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या पर्रिकरांच्या मुलाचाही पराभव झाला आहे.
उत्तरप्रदेशात काय घडलं?
- नोटा ०.६९ % (२,३२, १९७ मते )
- राष्ट्रवादी काँग्रेस ०.०५ %
- शिवसेना ०.०२ %