Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अबब! पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक प्रचारावर भाजपाचा २५२ कोटींचा खर्च!!

November 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bjp spent 252 crore on assembly election campaigns

मुक्तपीठ टीम

यावर्षीच्या सुरुवातीला आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये विधानसभा निवडणूका झाल्या. यामध्ये भाजपाला आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भरघोस यश मिळालं मात्र या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगलाच पैसा खर्च केला आहे. भाजपाने निवडणुकी प्रचारावर २५२ कोटी रुपये खर्च केला आहे. जवळपास ६० टक्के तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरले. सर्वाधिक खर्च केलेल्या बंगालमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

 

पाच राज्यांच्या निवडणुका, भाजपाचा २५० कोटींचा खर्च!

  • भाजपाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलानुसार, पक्षाने या पाच राज्यांच्या प्रचारात २५२ कोटी ०२ लाख ७१ हजार ७५३ रुपये खर्च केले आहेत.
  • बंगालमध्ये भाजपाने १५१ कोटी रुपये खर्च केले.
  • तेथे आटोकाट प्रयत्नांनंतरही ममतांच्या तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.
  • आसाममध्ये ४३.८१ कोटी रुपये खर्च केले, तेथे भाजपाने सत्ता राखली.
  • पुद्दुचेरीमध्ये ४.७९ कोटी रुपये खर्च केले, तेथे भाजपासह प्रादेशिक पक्षांची सत्ता आली.
  • तामिळनाडूमध्ये पक्षाने २२.९७ कोटी रुपये खर्च केले, तेथे द्रमुकने भाजपाच्या मित्रपक्ष अण्णा द्रमुकची सत्ता हिरावून घेतली.
  • तामिळनाडूत भाजपाला केवळ २.६ टक्के मते मिळाली आहेत.

 

सर्वाधिक आर्थिक ताकद असलेला पक्ष हा भाजपच आहे. इलेक्टोरल बॉन्डप्रणाली मोदी सरकारने निर्माण केली, त्यात स्वतःची आर्थिक ताकद वाढण्याबरोबरच इतर पक्षांना मदत मिळू नये हा उद्देश होता. एकाधिकारशाहीतून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीही केली जात नाही. म्हणून भाजपा अनधिकृत खर्चही प्रचंड करते https://t.co/eQrrRn40UW

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 12, 2021

ममतांच्या पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा सर्वाधिक खर्च! पण तृणमूलही पुढेच!

  • पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून घालवण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले.
  • या राज्यात पक्षाने १५१ कोटी रुपये खर्च केले.
  • केरळमध्ये, जिथे डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आपली सत्ता वाचवण्यात यशस्वी ठरली, तिथे भाजपने २९.२४ कोटी रुपये खर्च केले.
  • विविध पक्षांनी सादर केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाने सार्वजनिक केला आहे.
  • तृणमूल काँग्रेसने सादर केलेल्या खर्चाच्या तपशिलानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजपापेक्षा थोडे अधिक म्हणजे १५४.२८ कोटी रुपये खर्च केले.

Tags: BJPelection campaignelection commissionTMCwest Bengal election 2021तृणमूल काँग्रेसनिवडणूक आयोगपश्चिम बंगालभाजपा
Previous Post

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम – डॉ. भागवत कराड

Next Post

सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post
dilip walsee patil

सर्पदंश आणि त्यावरील उपचारांबाबत जागृती करणे गरजेचे - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!