मुक्तपीठ टीम
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे. भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. २०१६ मध्ये क्लीन स्वीप करत पहिल्यांदाच भाजपने आसाममध्ये आपला मुख्यमंत्री बसवला होता. त्यामुळे सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर होतं. त्यात सीएए कायद्याला होत असलेला विरोध पाहता काँग्रेसने हा निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा बनवला. मात्र याचा फारसा परिणाम मतदारांवर झाल्याचं काही पाहायला मिळालेलं नाही.
आसाम विधानसभा निकाल- सुरुवातीचे कल
- बहुमताचा आकडा – ६४
- भाजप – ७६
- काँग्रेस – ४८
- इतर – २
- एकूण जागा – १२६
आसामसाठी काय होते एक्झिट पोलचे अंदाज?
• भाजपाची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये १२६ जागांवर निवडणूका पार पडल्या असून एक्झिट पोलनुसार भाजपा सत्ता टिकवून ठेवणार असल्याचा अंदाज व्यक्त झाले होते
• रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७९ जागास काँग्रेसला ४५ जागा आणि इतर २ जागा
• टाईम्स नाउ- सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ६५ जागा, काँग्रेसला ५९ जागा आणि इतर २ जागा
• इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ८० जागा, काँग्रेसला ४५ जागा आणि इतर २ जागा
• टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७० जागा, काँग्रेसला ५६ जागा आणि इतर २ जागा
• जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७३ जागा, काँग्रेसला ५३ जागा
• पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला ७३-७४ जागा, काँग्रेसला ५१-५२ जागा आणि इतर १-२ जागा