मुक्तपीठ टीम
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गोव्यात भाजाप रुजवणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना त्यांच्या पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पण उत्पल पर्रीकरसाठी दुसरा पर्याय देण्यात आलेला असल्याचे भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तो पर्याय उत्पल स्वीकारणार की एका ज्येष्ठ नेत्याचा मुलगा भाजपाला आव्हान देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
उत्पल मनोहर पर्रीकर हा पणजीहून तिकीट मागत होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील भाजपा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्या पर्रीकरांच्या पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदाराला तिकीट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले फडणवीस?
उत्पल पर्रीकर यांना दोन पर्याय देण्यात आले. त्यापैकी एकाला त्याने आधीच नकार दिला होता. दुसऱ्या जागेबाबत चर्चा सुरू आहे. आशा आहे की तो सहमत असेल. पर्रीकर कुटुंब हे आमचे कुटुंब आहे.