मुक्तपीठ टीम
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. पटोले यांनी ‘मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून या वक्तव्याचा निषेध होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पटोलेंवर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक करावी, अशी विनंती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली तर फडणवीस, पाटील बावनकुळे यांनीही पटोलेंवर निशाणा साधला आहे.
पटोलेंना अटक करण्याची गडकरींची मागणी
- नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांच्या विषयी आक्रमक भूमिका घेतलीय.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे.
- पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,अशी मागणी नितीन गडकरी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, देवेंद्र फडणवीस
- ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री
- त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय?
- कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही ? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?
- नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!
नेता तैसा कार्यकर्ता, चंद्रकांत पाटील
- ‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत.
- त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळं काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखं त्यांचं वर्तन सुरु आहे.
- पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शाहांवर त्यांनी आरोप केला की त्याचाच हा कट आहे.
- काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही.
- भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही.
- त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटलं त्यावेळी आम्ही राज्यभरात केसेस दाखल करण्याचा प्रयत्न झाला.
- पण कुठल्याही पोलीस ठाण्यात केस दाखल होऊ शकली नाही.
- राणे साहेबांनी नितेश कुठे आहे हे माहिती असल्याचं वक्तव्य केल्यानंतर पोलीस त्यांच्या घरावर नोटीस लावायला पोहोचले.
- राणे साहेब म्हणाले असतो तर एक थोबाडीत मारली असती, त्यावर त्यांना अटक केली. पण नाना पटोलेंना हात लावायची हिंमत नाही. कारण काँग्रेस पाठिंबा काढून घेईल.
- गळं खुर्चीभोवती सुरु आहे. भाजप हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा.
नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली-जगदीश मुळीक
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.
- त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे.
- महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना ईलाजासाठी १ हजार १ रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत.
- तसंच ‘नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न….
- आज नाना पटोले यांनी आज केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे.
- त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे. नाना पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत.
पटोलेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- बावनकुळे
- नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.
- पटोले यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय.
- तसंच देशद्रोह करणे, पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करणं, लोकांना उकसवणं, पंतप्रधानांच्या जीवाला धोका होईल अशी वर्तणूक करण्याचं काम पटोले यांनी केलं आहे.
- त्यामुळे पटोले यांच्यावर देशद्रोहाचा आणि लोकांना उकसवण्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली.
अशा प्रकारचं वक्तव्य भयानक, प्रविण दरेकर
- मला वाटतं अशा प्रकारचा व्हिडीओ असेल आणि पटोले कार्यकर्त्यांशी बोलत असताना असं वक्तव्य केलं असेल तर ते दुर्दैवी आहे.
आगामी राजकारणासाठी हे चिंताजनक आहे. - खरं म्हणजे नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशा प्रकारची वक्तव्ये अनेकदा त्यांनी केली आहेत.
- बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे.
- राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांवर टीका करतो, राजकीय टीका असतात, सरकार म्हणून टीका करतो.
- मात्र, अशा प्रकारचं वक्तव्य भयानक आहे.
- काँग्रेसला आज जरी देशभरात यश मिळालं नसलं तरी एक वैभवशाली परंपरा असलेला हा पक्ष आहे.
- अनेक चांगले नेते होऊन गेले आणि आजही आहेत.
- पण नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपणाचा बालिशपणा मांडून ठेवला आहे की, प्रत्येक आठवड्याला खालच्या पातळीची टीका करणं, बालिश वक्तव्ये करणं आणि आता तर पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत.
- आपण सरकार म्हणून, देशाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो.
- पण याठिकाणी प्रत्येक गोष्टी राजकारण, तिरस्काराने पाहत असू, आता तरी मारण्याची भाषा होत असेल तर हे लाजिरवाणं आहे.
नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ ची गरज, केशव उपाध्ये
- “काँग्रेसचे नाना पटोले यांना ‘समुपदेशना’ ची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाजी यांचा मोदीद्वेष नवा नाही.
- या द्वेषापोटी आपण काय बोलतो आहोत याचे भान त्यांना राहिलेले नाही.
- मोदींजीच्या विरोधात वारंवार गरळ ओकल्याने आपल्याला राहुल गांधी ‘बक्षिसी’ देतील या समजापोटी ते वारंवार बेताल होऊ लागले आहेत.
- आज नानाजी जे काही बोलले आहेत ते पाहता त्यांच्या ‘समुपदेशना’ची गरज आहे असं दिसतं आहे.
- यापेक्षा त्यांच्या वक्तव्यावर वेगळया मार्गाने व्यक्त होता येणे अवघड आहे.