Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या हिटलिस्टवर का आहेत अनिल परब ?

April 5, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
kirit somiyya (1)

मुक्तपीठ टीम

राज्याच्या गृहमंत्रीपदावरून अनिल देशमुख पायउतार झाल्यानंतर भाजपाने संजय राठोठानंतरच दुसरं लक्ष्य साधले आहे. मात्र, त्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या थेट परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव घेत यानंतर नंबर अनिल परब यांचा लागणार आहे असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सोमय्यांच्या हिटलिस्टवर अॅड. अनिल परब का आहेत यावर राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरण हे बनावट असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून शिवसेना लक्ष्य झाली होती. मात्र, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर थेट आरोप करणारा शंभर कोटीच्या महावसुलीचा आरोप करणारा लेटर बॉम्ब फोडला. त्यानंतर स्फोटके प्रकरणातील आरोपी सचिन वाझेच्या शिवसेना संबंधांचा हवाला देत भाजपाच्या रेंजमध्ये असलेली शिवसेना काहीशी बाजूला गेली. अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवरच हल्लाबोल सुरु झाला. मात्र, त्याचवेळी सोमय्यांसह काही नेत्यांनी सचिन वाझेंच्या संपर्कात असलेल्या एका विधान परिषद सदस्याचा उल्लेख करत संशय निर्माण करणे सुरु ठेवले होते. पुढे तर थेट नाव घेत गृहखात्याबद्दल अनिल परबांना लक्ष्य करण्यात आले.

  • शिवसेना, ठाकरे कुटुंबीयांच्या जवळच्या वर्तुळात अनिल परब हे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
  • कॉर्पोरेट सेक्टरपासून न्यायालयीन वर्तुळापर्यंत अनिल परबांचा वावर असतो.
  • शिवसेनाप्रमुखांचे मृत्यूपत्र असो की शिवसेनेची कोणतीही कायदेशीर लढाई तेथे अनिल परब असतातच असतात.
  • मनसे नगरसेवक फोडण्यापासून ते इतर अनेक गोपनीय राजकीय हालचालींमध्ये परब हे कुठेही, काहीही न बोलता सक्रिय असतात.
  • ठाकरे मंत्रिमंडळात परिवहन मंत्री असलेले अॅड. अनिल परब हे तसे मितभाषी आहेत, मात्र ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेसाठी ते
  • रस्त्यावरच्या शिवसैनिकासारखे आक्रमक होतात.
  • सत्ता आल्यापासून त्यांच्या वागण्यात काहीसा तुटकपणा, अंहभाव आल्याचे मानले जाते.
  • त्यामुळे त्यांच्या जवळचीही काही माणसे दुरावली आहेत.
  • त्यातूनच त्यांच्या हालचालींची माहिती भाजपाच्या नेत्यांना मिळू लागली असावी.
  • त्यातूनच शिवसेनेच्या या महत्वाच्या मोहऱ्याला लक्ष्य करण्यासाठी भाजपाने निवडले असावे, अशी शक्यता आहे.

Tags: anil deshmukhAnil ParabBJPKirit Somaiya
Previous Post

राठोड गेले, देशमुखांना पाठवले…पुढचा नंबरही सोमय्यांनी सांगून टाकला!

Next Post

नव्या रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, ४८ तासात ९० मृत्यू

Next Post
Corona Control-1

नव्या रुग्णांची संख्या ५० हजाराखाली, ४८ तासात ९० मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!