मुक्तपीठ टीम
शरद पवारांनी राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. जेम्स लेनने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याला बाबासाहेब पुरंदरेंनी वादग्रस्त पुस्तकासाठी कोणतीही माहिती पुरवली नव्हती, असा दावा केला आहे. त्याचा आधार घेत भातखळकर पुढे सरसावले आहेत.
शरद पवार बाबासाहेब पुरंदरेंबद्दल काय बोलले होते?
- राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत, असं म्हटलं.
- त्यांनी त्याचा संदर्भ देत शरद पवारांवर महाराष्ट्रात जातीयवाद वाढवल्याचा आरोप केला.
- ते म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता.
- शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं.
- जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती.
- यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
- या सर्व प्रकरणावरून आणि जेम्स लेन यांची मुलाखत समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातळखकर यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे.
- त्यांनी इडिया टुडेतील मुलाखतीची लिंक ट्वीट केली आहे.
- ते म्हणाले की, घ्या शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला.
- ज्या मुद्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला.
- Shivaji:Hindu King in Islamic India चा लेखक जेम्स लेन याने आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो असे स्पष्ट केलंय.
- आता महाराष्ट्रात विनाकारण पेटवपेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का?
- राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी.
हा घ्या पुरावाhttps://t.co/e6ddfQiet7.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2022