मुक्तपीठ टीम
बलात्काराच्या आरोपाच्या भोवऱ्यात सापडलेले राष्ट्रवादी पक्षनेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली गेल्यानंतर आता विरोधात उतरलेल्यांनाही भूमिका बदलावी लागत आहे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने बलात्काराची तक्रार मागे घेतली असली तरी तिच्यावरच खोट्या तक्रारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. तर मुंबईतील नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी तक्रार खोटी असल्यानेच आपण त्या महिलेविरोधात आवाज उठवल्याचे म्हटले आहे. तक्रार मागे घेतल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून आता त्या महिलेच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार झाल्यानंतर भाजपाचे नेते आणि महिल्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, आता त्यांच्यापैकी काहींनी भूमिका बदलली आहे. भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारदार महिलेविरोधात खोट्या तक्रारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे प्रकरणात ज्यांच्या भूमिकेमुळे वेगळे वळण आले ते भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही महिलेने तक्रार मागे घेतले ते योग्यच केल्याचे म्हटले आहे. यामुळेच आपण तिच्या कांगावेखोरीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/MBVGH8JgzT
— renu sharma (@renusharma018) January 22, 2021
त्या म्हणाल्या की, पीडित महिलेने खोटी तक्रार दिली असेल तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई केली जावी. एखाद्यावर खोटे आरोप ठेवल्यास त्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त होते. त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. अशा परिस्थितीत खोट्या तक्रारी करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध १० जानेवारी रोजी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. तसेच मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर पीडित महिलेला यासंबंधित एक प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. जेणे करून पुढे त्या महिलेने आपल्या जबानीपासून घुमजाव करू नये.
पीडित महिलेने तक्रार मागे घेताना सांगितले की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार माध्यमांमध्ये गाजू लागली. त्यामुळे काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी स्वत:चे हिशेब चुक्ते करण्यास सुरूवात केली. राजकारण सुरु झाल्याने मी धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत आहे.
पाहा व्हिडिओ: