मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट सत्तेमुळे माज आला असल्याचेही बजावले. त्यांच्या आक्रमकतेला भाजपाकडून भाजपा नेते मोहित कंबोजांनी उत्तर दिलं आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन्ही मोठे नेते मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांनी ट्वीट करत लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच त्यांनी अजित पवारांविरोधातील सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
राष्ट्रवादीचा बडा नेता मलिक-देशमुखांना भेटणार!!
हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार. असं मोहित कंबोज यांनी पहिलं ट्वीट केलं आहे.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार, मोहित कंबोज
मी लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार आहे. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी
I Will Be Doing Press Conference Soon And Exposing NCP BIG Leader :-
1:- List Of Assets India & Abroad
2:- Benami Companies
3:- Properties on Girl Friends Name
4:- Corruption Done As Minister in Various Portfolio
5: Family Income And Assets List !Watch The Space Now !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा होणार?
२०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Irrigation Scam Case Should Be Investigated Again Which Was Closed in 2019 By Param Bir Singh ! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Ji @mieknathshinde Ji @Devendra_Office
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022