मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात भाजपा नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्यावर होणाऱ्या कारवाईचे लोण यूपीतही पोहचले आहे. कानपुरातील हिंसाचारप्रकरणी फेसबुक आणि ट्विटरवर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी यूपी पोलिसांनी भाजपा नेत्याला अटक केली आहे. पोलिसांनी ती पोस्ट डिलीटही केली आहे.
सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक केलेल्या भाजपा नेत्याचे नाव हर्षित श्रीवास्तव उर्फ लाला आहे. त्यांना कानपूरमधील कर्नलगंज पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
भाजपा नेत्यावर यूपी पोलिसांनी का केली कारवाई?
- हर्षित श्रीवास्तव उर्फ लाला हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा मंत्री आहेत.
- यापूर्वी ते डीएव्ही महाविद्यालयाच्या छात्रसभेचे अध्यक्ष होते.
- त्यांनी त्यांनी ट्विटर अकाऊंटने एक ट्वीट आणि फेसबुकवर एक पोस्ट केली होती, जी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप आहे.
- ही बाब निदर्शनास येताच पोलीस सक्रिय झाले. आयपीसीच्या कलम 153A (धर्म किंवा जातीच्या नावाने द्वेष पसरवणे), 295A (धार्मिक भावना भडकावणे), 507 आणि 67 आयटी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध लगेच गुन्हा दाखल करण्यात आला.
- शहराचे वातावरण बिघडवणारे असे कोणतेही काम जनतेने करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.