Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालमध्ये भाजपाच्या यादीत तृणमूल काँगेसचे १५० नेते, दोघांनी उमेदवारी झिडकारली!

March 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
tmc bjp

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ज्या तृणमूल कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे, आता त्याच पक्षातील दीडशे नेत्यांना निवडणुक लढवण्यासाठी तिकीट दिली आहे. आतापर्यंत भाजपने एकूण २८९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यातील जवळपास निम्म्या लोकांनी ममता बॅनर्जीना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये ८ मुस्लिम उमेदवारांनाही तिकीट देण्यात आले आहे. तसेच दोन उमेदवार तर असेही आहेत, जे दुसऱ्या पक्षात असूनही न मागताच तिकीट दिले. त्यांनी भाजपाची उमेदवारी जाहीररीत्या झिडकारली.

अनेक उमेदवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप

  • भाजप बंगालमधील भ्रष्टाचार संपवण्याविषयी बोलत आहे. दुसरीकडे, त्यांनी ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यापैकी बर्‍याच जणांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे.
  • भाजपचे नेते मात्र हा प्रश्न कोणावरही आरोप सिद्ध झालेला नसल्याचे सांगत फेटाळून लावतात. सध्या चौकशी सुरू आहे.
  • आतापर्यंत पक्षाने २८९ नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी तब्बल दीडशे असे उमेदवार आहेत, ज्यांनी तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. पक्षाची यादी पाहिल्यावर असे वाटते की त्यांना अद्याप बंगालचे राजकारण समजलेले नाही, अशी टीका होऊ लागली आहे.

 

पक्षात नसलेल्या दोघांना उमेदवारी, त्यांनी झिडकारलं!

  • गुरुवारी भाजपने जाहीर केलेल्या १५७ उमेदवारांपैकी २ उमेदवारांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला नाही किंवा तिकिटाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
  • पहिले नाव तरुण साहाचे आहे. तरुण यांची पत्नी माला साहा तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार आहेत. भाजपाने त्यांना काशीपूर-बेलगाछिया येथून उमेदवार केले.
  • या यादीमध्ये भाजपने माझे नाव कसे जाहीर केले ते माहित नाही. मी काल रात्रीपर्यंत तृणमूल कॉंग्रेसचा झेंडा लावण्याचे काम केले आहे. मी पक्षाला कळविले आहे की, भाजपने अनावश्यकपणे या नावाचा समावेश केला आहे. मी तिथल्या कोणाशीही बोललो नाही, असे त्यांनी सांगितले.
  • त्याचप्रमाणे पक्षाने उत्तर कोलकाताच्या चौरंगी येथून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली आहे. परंतु मी भाजपमध्ये सामील झालेली नाही असे बोलत त्यांनी निवडणुक लढवण्यास नकार दिला आहे.
  • अनेक वर्षांपासून भाजपासाठी काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष केले आणि तृणमूलच्या बंडखोरा नेत्यांना तिकीट दिले, त्यामुळे भाजपासाठी खस्ता खाणारे निष्ठावान नाराज झाले आहेत.

Tags: BJPtrunmul congressतृणमूल काँग्रेसभाजपाममता बॅनर्जी
Previous Post

गुन्हे महत्वाचे : 1)औषध आणण्यासाठी मेडिकलला चाललेल्या एका वृद्धेला भर रस्त्यात लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्धेची दिशाभूल करून तिला बाजूला नेले. तिथे वृद्धेच्या तोंडाला रुमाल बांधून त्यांच्या हातातील चार तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या बळजबरीने काढून नेल्या. 2) नवी मुंबईमधील बिखी कल्पेश परमार या विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा व सासऱ्यास अटक केली आहे. बिखीने तिच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून एपीएमसी पोलिसांनी तिच्या पतीसह सासरे व दिराविरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 3) न्यायालयाने लावलेली हजेरी बंद करून गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी, पाच हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यातील दोन लाचखोर हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी नारेगाव पोलिस चौकीत रंगेहाथ ताब्यात घेतले. 4)धुतूम येथे हिंदुस्तान कंटेनर यार्ड मधून बायो डिझेलचा टँकर जप्त करून उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. टँकर क्रमांक एम एच ४३ वाय ८१५१ क्रमांकाचा टँकर बायोडिझेल घेऊन धुतूम येथील हिंदुस्थान कंटेनर यार्ड मध्ये बायो डिझेलचा टँकर आढळून आला. हा टँकर कोणाचा आहे आणि ह्या यार्डमध्ये काय करतोय? कंटेनर यार्डचे व्यवस्थापक कोण आहे? यार्डचे मालक कोण आहे? विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी ह्याचे उत्तर दिले नाही.

Next Post

महाराष्ट्रात दर दिवशी तीन लाख लसीकरण! मुख्यमंत्र्यांचे तयारीचे आदेश!!

Next Post
uddhav thackeray

महाराष्ट्रात दर दिवशी तीन लाख लसीकरण! मुख्यमंत्र्यांचे तयारीचे आदेश!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!