Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल,” पहारेकरी भाजप आक्रमक!

शिवसेनेच्या मनपा कारभाराचा मुंबईकरांकडे जाऊन पंचनामा करण्याचा इशारा

January 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
Kishori Pednekar Prabhakar Shinde

मुक्तपीठ टीम

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेत भाजपमधील पहारेकरी आता आक्रमक झाला आहे. भाजपने शिवसेनेच्या मुंबई मनपातील कारभारावर कोरडे ओढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरु असल्याची टीका भाजपने केली आहे. तर धनाढ्यांवर सवलतींचा वर्षाव, सामान्य मुंबईकरांच्या गळ्यात करांचा धोंडा बांधणारा अर्थसंकल्प शिवसेनेने सादर केल्याचा आरोप भाजपचे मनपा गट नेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

मुंबई मनपातील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आपल्या निवेदनात शिवसेनेच्या कारभारावर टीका करताना पुढील मुद्दे मांडले आहेत:

उत्पन्नात प्रचंड घट 

वर्ष २०२०-२१ मध्ये महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर आहे. १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रत्यक्षात प्राप्त झालेले उत्पन्न अंदाजित उत्पन्नाच्या केवळ २५ टक्के आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर अंदाजित प्राप्ती रु.६७६८.५८ कोटी पैकी केवळ ७३४.३४ कोटी आणि विकास नियोजन खात्याची प्राप्ती ३८७९.५१ पैकी केवळ ७०८.२० कोटी म्हणजे केवळ १४ टक्के एवढीच उत्पन्नाची प्राप्ती ३१.१२.२०२० पर्यंत झालेली आहे. जीएसटीतून मिळणारे अनुदान सहाय्य केंद्रातून राज्य सरकारमार्फत १०० टक्के प्राप्त झालेले आहे. महसुली खर्च आणि कोविडवर झालेला रुपये २१०० कोटी अतिरिक्त खर्च पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी तूट येणार आहे असे चित्र आज तरी दिसते. हे अर्थसंकल्पीय वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिने राहिले आहेत. एवढ्या कमी कालावधीत प्रशासनाने किती प्रयत्न केले तरी उत्पन्न हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढेल असे आजचे चित्र नाही.

आकडे चलाखी

दि.४ फेब्रुवारी २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीस सादर केलेले वर्ष २०२०-२१ चे अर्थसंकल्पीय अंदाज आणि २० ऑगस्ट २०२० रोजी महापालिकेने मंजूर केलेले अर्थसंकल्पीय अंदाज यात आकडे चलाखी केलेली आहे. त्यामुळे वर्ताळा (surplus) रुपये ६.५२ कोटी वरून रुपये २५७९.६६ कोटीवर दर्शविला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये उत्पन्नात कुठलीही वाढ किंबहुना अंदाजित प्राप्तीच अपेक्षित नसताना आणि महसुली खर्चात वाढ होत असताना वर्ताळा (surplus) रुपये २५७९.६६ कोटीवर कसा गेला हे अनाकलनीय आहे.

 

कोविड आर्थिक महामारी

कोविडच्या नावाखाली रु. २१०० कोटींचा जम्बो खर्च, आकस्मिक निधी शून्यावर आणि राखीव निधीवरही मोठा डल्ला मारावा लागणार असल्यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. आणी दैनंदिन खर्चासाठी कर्ज रोखे काढण्याची वेळ आली आहे ही बाब भूषणावह नाही.

 

धनाढ्यावर आर्थिक सवलतींचा वर्षाव

याचवेळी धनाढ्य बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये दिलेली ५० टक्के सूट, कंत्राटदाराना दिलेली सुरक्षा/ अनामत रक्कम आणि कामगिरी हमी राखीव रक्कम ठेवीत दिलेली मोठी सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात दिलेली ५० टक्के सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी दिलेली १०० टक्के सूट, ताज हॉटेलला रस्ता शुल्कामध्ये ५० टक्के आणि पदपथ शुल्कामध्ये १०० टक्के सूट अशा विविध सवलतींचा वर्षाव धनदांडग्यांवर केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

 

सामान्य मुंबईकरांच्या गळ्यात करांचा धोंडा

कोविड आणि लॉकडाउनने त्रस्त सामान्य मुंबईकरांच्या माथी मात्र वाढीव वीज बिलाचा भार, अव्वाच्या सव्वा रुग्णालयीन बिलांचा मार, रेल्वे अद्याप सुरू न झाल्यामुळे होणारा अवाढव्य प्रवास खर्च लादला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांना २०१५ ते २०२० पर्यंत महापालिकेच्या ठरावानुसार मालमत्ता करातून वगळण्यात आले होते. परंतु आता सर्व पाचशे चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार आहेत. महापालिकेच्या मंडईत व्यवसाय करणारे छोटे स्टॉलधारक, भाजीविक्रेते, मासे विक्रेते यांचेही व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. परंतु विकासकांपासून जाहिरातदारांपर्यंत आणि हॉटेल मालकांना घसघशीत सूट देणाऱ्या मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने या सर्वसामान्य मुंबईकर मराठी स्टॉलधारकांना अनुज्ञापन शुल्कात एक रुपयाही सूट दिलेली नाही.दामदुप्पट वीजबिल, प्रवास खर्च, रुग्णालयाचे वाढते बिल आणि बेरोजगारीची लटकती तलवार यामुळे त्रस्त सर्वसामान्य मुंबईकरांच्या गळ्यात महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी १०० टक्के करांचा धोंडा बांधण्याचे काम केले आहे.

 

भाजपचे मनपा गट नेते प्रभाकर शिंदे यांनी  असंवेदनशील प्रशासनाचा आणि धनदांडग्यांची काळजी वाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, असे म्हटले आहे. तसेच महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने प्रशासनाशी संगनमत करून मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. आता ही बाब आम्ही मुंबईकर जनतेच्या दरबारात घेऊन जाणार आहोत, असा इशाराही दिला आहे.


Tags: BJPbjp attacked shivsenaBMCbmc budgetMayor Kishori Pednekarprabhakar shindeShivsenaप्रभाकर शिंदेभाजपमनपामनपा अर्थसंकल्पमहापौर किशोरी पेडणेकरमुंबई मनपाशिवसेना
Previous Post

निफाडमध्ये भर दिवसा बिबट्याचा संचार, गावकऱ्यांमध्ये दहशत

Next Post

#व्हाअभिव्यक्त! “ठाकरे सरकारने मराठवाड्याचा उगवला सूड”

Next Post
mantralya-mumbai

#व्हाअभिव्यक्त! “ठाकरे सरकारने मराठवाड्याचा उगवला सूड”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!